- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोला महानगर पालिका
उत्तर झोन येथे कार्यरत असलेला 50 वर्षीय मालमत्ता कर वसुली लिपीक संदिप गंगाधर जाधव एका प्रकरणात लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (अकोला) च्या सापळ्यात अडकला. 20 हजाराची रक्कम स्वीकारताना या लाचखोर लिपिकाला एसीबीने रंगेहाथ पकडले. गुरुवार 23 मार्च रोजी दुपारी 12:54 ते 14:05 वाजताच्या सुमारास ही यशस्वी कारवाई झाली.
फिर्यादीचे मालमत्तेच्या कराची रक्कम कमी करुन त्यांचे नावाची म.न. पा. च्या मालमत्ता रेकॉर्डला मालमत्ता धारक म्हणुन नोंद घेण्यासाठी लाचेची मागणी करून या भ्रष्ट लिपिकाने लाच रक्कम स्विकारली असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
फिर्यादी यांचे तक्रार नुसार 20 मार्च रोजी आरोपी लोकसेवक संदिप गंगाधर जाधव (वय 50 वर्ष, पद-मालमत्ता कर वसुली लिपीक, महानगर पालिका, अकोला, जि. अकोला, वर्ग-3) याने फिर्यादीचे मालमत्तेच्या कराची रक्कम कमी करून त्यांचे नावाची म.न.पा.च्या मालमत्ता रेकॉर्डला मालमत्ता धारक म्हणुन नोंद घेण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती .
त्याअनुषंगाने 23 मार्च रोजी पंचांचे समक्ष सापळा कार्यवाही करण्यात आली. आरोपी लोकसेवकाने फिर्यादी यांचेकडून तडजोडी अंती वीस हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारली असता, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई एसीबी अकोलाचे पोलीस निरिक्षक तथा प्रभारी पोलीस उपअधिक्षक सचिन सांवत, पोलीस निरिक्षक नरेंद्र खैरनार, व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोलाच्या सापळा पथकातील कर्मचारी यांनी केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा