sant narhari maharaj temple: संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा





भारतीय अलंकार 24

(ॲड. नीलिमा शिंगणे जगड)

अकोला : गुरुदत्त नगर, डाबकी रोड येथील श्री संत नरहरी महाराज मंदिरामध्ये संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा बुधवार ८ फेब्रुवारी रोजी समाज बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला.




कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे विलास अनासने, श्रीरंगदादा पिंजरकर, केशवराव खांडेकर, संतोष अनासने, विलास शेळके, सुरेश टकोरे, भागवत टेंबे, डॉ.अरुण ठोसर, नारायण रत्नपारखी उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक गणेशराव विंचनकर, रामराव रत्नपारखी, रघुनंदन पिंजरकर, बाळकृष्ण धरमकर, मधुकर आसरे, पुरुषोत्तम चेडे, सागर भूयारकर  तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच पुष्पा प्रमोद गोगटे (खडका मुर्तीजापुर) व सदस्य अथर्व विजयकुमार धरमकर (दहिगाव तेल्हारा) समाजकरीता योगदान देणारे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाकर सालफळे, सुभाष टेंबे, रामदास भुयारकर, पांडुरंग तारापुरे, महादेव ठोसर, सारंगधर ढोले तसेच समाजातील शून्यातून आपला व्यवसाय वाढवणारे होतकरू व्यावसायिक श्रीकांत पिंजरकर, संतोष धरमकर, निलेश टेंबे, संतोषराव धरमकर, विशाल मोगरे, दत्ताभाऊ पाटणे, विजय बुटे, विकास रत्नपारखी, प्रशांत उंबरकर, अशोक पिंजरकर, नागोराव झाडे, करण उज्जैनकर, सागर मोलकर, सारंगधर टेंभे सर्वांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी दोन होतकरू गरजु महिलांना डॉ. गजानन कऱ्हे यांचेकडून शिलाई मशिन भेट देण्यात आल्या.  महाप्रसादाचे संपूर्ण योगदान नंदकिशोर पाचकवडे यांनी दिले. 




कार्यक्रमासाठी शाम विंचनकर, संजय सालफळे, गजानन धरमकर, श्रीनंदकिशोर पिंजरकर, अशोक पिंजरकर, संतोष धरमकर, बाबूलाल पाटणे, भास्कर सालफळे, गणेश हिरोळकर, सचिन शेंदुरकर, प्रभाकर झाडे, हरिभाऊ झाडे, गजानन उज्जैनकर, सचिन उज्जैनकर व श्री संत नरहरी महाराज मंदिर कार्यकारीणीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गजानन कऱ्हे तर आभार कार्याध्यक्ष प्रभाकर मोगरे यांनी मानले. सूत्रसंचालन गणेश देवगिरकर व डॉ.  रोहिणी धरमकर यांनी केले.

टिप्पण्या