kumar vishwas kavya kalash: 'शो मस्ट गो ऑन' प्रकृती स्वास्थ खराब असूनही कुमार विश्वास यांनी अकोल्यात रंगवली काव्य मैफल…




 

ठळक मुद्दे 

*मोहब्बत एक एहसासों की पावन सी कहानी है…


*देश दोन महापुरुषांमुळे सुरक्षित आहे- डॉ.कुमार विश्वास


*काव्य कलश मधून सामजिक विसंगतीवर वार, राजकीय व्यंगावर बोट 



ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

भारतीय अलंकार 24

अकोला: भारताचे लोकप्रिय युग कवी डॉ. कुमार विश्वास हे आपल्या कवितांचा नजराणा पेश करण्यास शुक्रवारी सायंकाळी राज राजेश्वर नगरीत आले होते. प्रकृती स्वास्थ खराब असून देखील कुमार विश्वास यांनी 'शो मस्ट गो ऑन ' या म्हणीनुसार काव्य मैफल रंगवून रसिकांची मने जिंकून 'काव्य कलश' ला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले. तमाम वैदर्भीयांची माफी मागून अकोल्यात पुन्हा येवून याची भरपाई नक्कीच करेल, अशी ग्वाही देत जवळपास वीस हजार श्रोत्यांचा निरोप घेतला.




ही काव्य मैफल कधी संपूच नये, असे रसिकांना वाटत होते. मात्र कुमार विश्र्वास यांची तब्येत प्रवास दरम्यान खराब झाल्याने अकोलेकर रसिकांना ते फार वेळ देवू शकले नाही. मात्र आपल्या लोकप्रिय रचना त्यांनी सादर करून रसिकांच्या मनात अधिकच आदर निर्माण केला.




"मोहब्बत एक एहसासों की पावन सी कहानी है

कभी कबिरा दिवाना था कभी मीरा दिवानी है

यहां सब लोग कहते हैं मेरी आंखों में आंसू हैं

जो तू समझे तो मोती है जो ना समझे तो पानी है"  ही रचना सादर करताच रसिकांनी मनमुराद दाद दिली.


पुकारे आँख में चढ़कर तो खु को खू समझता है

अँधेरा किसको कहते है ये बस जुगनू समझता है !!

हमें तो चाँद तारो में तेरा ही रूप दिखता है

मोहब्बत में नुमाइश को अदाए तू समझता है !!

ही लोकप्रिय रचना सादर करून वैदर्भीय रसिकांना पुन्हा येथे येण्याचे वचन देत कुमार विश्वास यांनी निरोप घेतला.


तत्पूर्वी त्यांनी 

किसी के दिल की मायूसी जहां से होके गुज़री है

हमारी सारी चालाकी वहीं पर खोके गुज़री है

तुम्हारी और मेरी रात में बस फ़र्क़ इतना है

तुम्हारी सोके गुज़री है हमारी रोके गुज़री है… आणि 

मैं अपने गीत ग़ज़लों से उसे पैग़ाम करता हूं

उसी की दी हुई दौलत उसी के नाम करता हूं

हवा का काम है चलना दीये का काम है जलना

वो अपना काम करती है मैं अपना काम करती हूं…आपल्या खास शैलीत गात मैफल मध्ये एक समा बांधला.


देश दोन महापुरुषांमुळे सुरक्षित 




काव्य मैफलच्या प्रारंभी कुमार विश्वास यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, देश दोन महापुरुषांमुळे सुरक्षित आहे. एक छत्रपति शिवाजी महाराज आणि एक डॉ.बाबासाहेब आंबेडकर. शिवाजी महाराज नसते तर आज मी दिल्लीला राहू शकलो नसतो. छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज स्थापन करुन वंचितांना जगण्याचा अधिकार दिला.



तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या वतीने कवी डॉ. कुमार विश्वास यांचे शुक्रवारी  'काव्य कलश ' कवी संमेलनाचे आयोजन केले होते. 

डॉ. कुमार विश्वास यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी अकोलेकरांची माफी मागून पुढल्या वेळी याची भरपाई करणार, अशी ग्वाही दिली. सुरवातीला श्री राज राजेश्वरला नमन करुन 'कस काय बरंय ' असा हजारों रसिकांशी संवाद साधून रसिकांची दाद मिळविली.

यावेळी सर्व कवींनी सामजिक विसंगतीवर आपल्या रचनातून प्रहार केले. हिंदी आणि मराठी कविताची मेजवानी काव्य कलश निमित्त प्रथमच रसिकांना मिळाली.



 


काव्य मैफलच्या प्रारंभी डॉ. कुमार विश्वास यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तीक्षणगतचे अध्यक्ष सुगत वाघमारे आणि परिवार कडून डॉ.कुमार विश्र्वास यांचे स्वागत  करण्यात आले. यावेळी अकोला वासियांकडून कुमार विश्वास यांचे दिक्षाभूमीचे प्रतिक व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन पावस सेंगर यांनी केले. व्यंग चित्रकार गजानन घोंगडे, मंगेश श्रीवास यांनी स्वतः कुमार विश्वास यांचे रेखाटलेले चित्र डॉ. विश्वास यांना भेट दिले. डॉ. दत्ता प्रसाद (पुणे) यांनी पाठविलेली गीत रामायण प्रत डॉ. विश्र्वास यांना प्रदान करण्यात आली.


कुमार विश्वास यांचे सहकारी कवी सुदीप भोला, कविता तिवारी, रमेश मुस्कान, कुशल खुशवाह यांचे स्वागत ॲड. संजय सेंगर, डॉ. गजनन नारे, श्रीकांत पिंजरकर, विष्णूदास मंडोकर, आनंद वानखडे, पद्माकर सदाशिव, अश्विन शिरसाट, विशाल शिंदे, ॲड. नितीन धूत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुगत वाघमारे यांनी केले. युग कवी कुमार विश्र्वास हे 102 ताप असतानाही डॉक्टर टीम सह व्हायनिटी व्हन मध्ये अकोल्यात रसिकांच्या प्रेमापोटी आले असल्याचे सांगत डॉ कुमार विश्वास यांचे आभार मानले. तसेच तिक्षणगत सोसायटीचे कार्य आणि त्यामागील भूमिका मांडली.



मंच संचलन कवी कुशल कुशवाह यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन ॲड. अनंत खेळकर,किशोर बळी, जया भारती यांनी केले. आभार तीक्ष्णगत वाघमारे यांनी मानले. काव्य मैफलला अकोला सह नांदेड, बुलडाणा, अमरावती, वर्धा, वाशिम येथून रसिकांनी हजेरी लावली.







सिरतचे विमोचन 

उद्योजक सुगत वाघमारे लिखित मराठी हिंदी कविता संग्रह ' सिरत ' चे विमोचन डॉ. कुमार विश्वास यांच्या हस्ते करण्यात आले. 




मराठी रचना सादर 

अकोल्याचे अमोल शिरसाट, गोपाल मापारी, उस्मानाबाद शेखर गिरी, नागपूरच्या मंदा खंडारे यांनी एका पेक्षा एक सरस रचना सादर केल्या. शेखर गिरी यांनी आपली 'सात वाजल्या नंतर ' ही लोकप्रिय गझल सादर करुन रसिकांची दाद मिळविली. 




टिप्पण्या