court case news: akola crime: शारीरिक अत्याचाराच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता





भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पीडितेच्या मुलाला जीवाने मारून टाकण्याची धमकी देवून पिडीतासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध केला, या आरोपातून आरोपी अजगर हुसेन अली याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.



हकिकत अशाप्रकारे आहे की, पातुर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिडीत महीला हिने फिर्याद दिली की, तिचा मुलगा अजगर हुसेन अली याचे मांडेच्या दुकानामध्ये घटनेच्या सात ते आठ महीन्यापुर्वी मजुरीच्या कामाला होता. अंदाजे 5 ते 6 महीन्यापुर्वी फिर्यादी ही तिचे मुलाला व मजुरीचे पैसे घेण्याकरीता रात्री 9.00 वाजताच्या सुमारस आरोपीच्या दुकानावर गेली असता आरोपीने फिर्यादीला दुकानाच्या आत बोलावुन पिडीते सोबत शारीरीक संबंध करण्याची मागणी केली नाहीतर मुलाला जीवाने मारून टाकण्याची धमकी देवून पिडीतासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध केला व रिर्पोट न देण्यासाठी पिडीतेस लग्नाचे आमिष दिले. व त्यानंतर सतत 2 ते 3 महीने फिर्यादीसोबत शारीरीक संबंध होत राहीले, अशा फिर्यादीवरून पोलीस स्टेशन पातुर येथे अपराध क. 363/2018 कलम 376 (2) (एन) 504 अन्वये गुन्हा दाखल करून तपासाअंती विद्यमान न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. 





सदर प्रकरणामध्ये एकुण सात साक्षीदारांची साक्ष सरकारी पक्षा तर्फे नोंदण्यात आली. त्यापैकी कोणतेही साक्षीदार फितुर झाले नाही. परंतु आरोपीच्या वकीलांनी साक्षीदारांच्या उलट तपासामध्ये तफावत व संशय आणल्यामुळे सरकार पक्ष आरोपी विरूद्ध आरोप सिध्द करू शकले नाही व विद्यमान अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एस. पी. गोगरकर यांनी आरोपी अजगर अली हुसेन अली याला सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले. सदर प्रकरणामध्ये आरोपी तर्फे ॲड. अली रजा खान, ॲड. अय्युब नवरंगाबादे यांनी बाजु मांडली.

टिप्पण्या