amt graduate constituency: अमरावती पदवीधर मतदार संघ: 30 तासानंतर निकाल हाती, भाजपचा पराभव, मविआचे धीरज लिंगाडे विजयी





ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल तब्बल 30 तासानंतर समोर आला आहे. यामध्ये भाजपचा सफाया होवून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मतमोजणीत मविआच्या धीरज लिंगाडे यांना 46 हजार 344 तर, भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांना 42  हजार 962 मते मिळाली आहेत.


अति तटीची लढत
फाईल फोटो 


गुरुवारी दुपार पर्यंत धीरज लिंगाडे हे 2 हजार मते घेऊन आघाडीवर होते. एकूण 28 पैकी 18 टेबलांवरील मतमोजणीत लिंगाडे हेच आघाडीवर होते. यानंतर भाजपचे उमेदवार डॉ.रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. तब्बल 8 हजार अवैध मते आढळून आल्याने पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने फेर मतमोजणी सुरू केल्याने हा निकाल समोर यायला उशीर होत गेला . यामुळे निकाल येण्यास दुसऱ्या दिवशी दुपार पर्यंत वाट पाहावी लागली. 




अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत कॉंग्रेसकडून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. दुसरीकडे भाजपसाठी आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यासाठीच डॉ. रणजीत पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती, अशी चर्चा होती.


दरम्यान पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर होते. तर विद्यमान आमदार व भाजप उमेदवार रणजीत पाटील पिछाडीवर होते. 1 ते 14 टेबलवरची मतमोजणीत भाजपचे रणजित पाटील यांना 11312 मते मिळाले होते तर काँग्रेसचे धिरज लिंगाडे यांना 11992 मते होती. दोघांच्या मतातील फरक 680 एवढा होता. मतांच्या फरकावरून दोघांमध्ये अतितटीची लढत होणार असल्याची चर्चा मतदार संघात होती. दरम्यान सकाळी अमरावती पदवीधर मतदारसंघाची पोस्टल मतमोजणी पूर्ण झाली होती.यात 192 मते वैध ठरली. 73 मते अवैध ठरली. सर्वाधिक अकोला जिल्ह्यातील 34 मते अवैध ठरली होती.




कोकणात भाजपा 

कोकणात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कोकणात भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत बाळाराम म्हात्रे यांना 20800 मते मिळाली. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना 9500 मते मिळाली. मविआच्या बाळाराम पाटील यांचा पराभव त्यांनी केला आहे.



नागपुरात मविमा 

 भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका बसला.नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी झाले.



लिंगाडे यांनी मानले सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार 

file photo 

आपली सर्वांची साथ प्रत्येक पावलावर होती. हा विजय तुमच्या निर्व्याज प्रेमाचा आहे. मार्गदर्शनासह अथक परिश्रम घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या मान्यवर नेत्यांनी, प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून लढलेल्या कार्यकर्त्यांनी आणि सत्याचाच त्रिवार विजय होतो हे पुन्हा एकदा सिद्ध करणाऱ्या अमरावती विभागातील माझ्या तमाम सुज्ञ पदवीधर बंधू आणि भगिनींनी ही विजयश्री खेचून आणली आहे. प्रसिद्धी माध्यमे आणि समाजमाध्यमांचीही विशेष साथ मिळाली. आपणांस एकूण ४६,३३० मते मिळाली असून ३,३६८ मतांच्या फरकाने महाविकास आघाडीचा महाविजय झाला आहे. आपल्या सर्वांचे आभार , अश्या शब्दात धीरज लिंगाडे यांनी आभार मानले.



अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक



अंतिम मतसंख्या


श्री . धीरज लिंगाडे -  46 हजार 344  ( विजयी घोषित)



डॉ. रणजीत पाटील - 42 हजार 962


निवडणूक निरीक्षक पंकजकुमार व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत श्री. लिंगाडे यांना विजयी उमेदवार म्हणून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.







टिप्पण्या