akola-crime-court-news-donad: शिक्षकांना जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी ग्राम पंचायत सदस्यची निर्दोष मुक्तता



 

भारतीय अलंकार 24

अकोला: महाराष्ट्र दिनानिमीत्त आयोजित झेंडा वंदनाचे कार्यक्रमात शाळेत अनधिकृतरित्या प्रवेश करुन मुख्याध्यापक व शिक्षकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन व जीवे मारण्याच्या धमक्या देवुन शाळेच्या कार्यक्रमाच्या रजिस्टरची पाने फाडुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणात भा.द.वि. चे कलम 353, 294, 504, 506 मधुन न्यायलयाने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.




विद्यमान 3 रे अकोला जिल्हा व सत्र न्यायाधिश, श्री सुनिल पाटील यांनी दोनद बु. गावातील रहिवासी आरोपी पंजाब बाजीराव प्रधान यांची भा.द.वि. चे कलम 353, 294, 504, 506 आरोपातून निर्दोष मुक्तता केली. 



आरोपीवर आरोप होता की, दि. 01मे 2003 रोजी महाराष्ट्र दिनानिमीत्त दोनद बु. गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये झेंडा वंदनाचा कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रम सुरु असतांना आरोपी पंजाब बाजीराव प्रधान याने अचानकपणे अनधिकृतरित्या शाळेत प्रवेश केला आणि शाळेतील मुख्याध्यापक व इतर शिक्षक यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन, तुमचा एकेकाचा मर्डर करून टाकतो असे म्हणुन शाळेच्या कार्यक्रमाचे रजिस्टर हातात घेवुन त्या रजिस्टरची पाने फाडली आणि रजिस्टर घेवुन गेला आणि शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचे शासकीय कामात अडथळा निर्माण केला. सदहु रिपोर्टवरून आरोपी पंजाब बाजीराव प्रधान यांचेविरुद्ध दि. 01/05/2003 रोजी अपराध क्र. 40/3 नुसार भा.द.वि. चे कलम 353, 294, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 





या प्रकरणात तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री सुनिल पाटील यांचे न्यायालयाने एकुण 09 साक्षीदार तपासले परंतु आरोपीचे वकील ॲड. देवानंद डी. गवई यांनी, आरोपी हा दोनद गावाचा तत्कालीन ग्राम पंचायत सदस्य होता आणि त्याला गावातील राजकीय वादविवादावरून कशाप्रकारे खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले हे उलटतपासाद्वारे व युक्तीवादाद्वारे हे न्यायालयास पटवुन दिले आणि आरोपीवर असलेले सर्व आरोप खोडुन काढले. आरोपीचे वकील ॲड. देवानंद डी. गवई यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन विद्यमान तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री सुनिल पाटील यांचे न्यायालयात आरोपीची सदर आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

टिप्पण्या