- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: जानेवारी मध्ये बार्शिटाकळी तालुक्यामध्ये मंदीरातील दानपेट्यांना लक्ष करून चोरटयांनी चोरीचा सपाटा लावला होता. ही बाब जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी उघडकीस आणण्यासाठी एक संयुक्त विशेष पथक स्थापन करण्याबाबात आदेशीत केले होते.
त्यानुसार विशेष पथक आरोपीचा शोध घेत असतांना 3 फेब्रुवारी रोजी महान चौकीचे पोलीस हवालदार दत्तात्रय चव्हाण यांना वाघागड मंदीर संस्थान यांचे कडुन माहिती प्राप्त झाली की, एक संशईत इसम हा मंदीरातील दानपेटया फोडण्याचा प्रयत्न करीत आहे.
या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे यांनी लागलीच पोलीस उप निरीक्षक बंडु मेश्राम, पो.हवा. दत्तात्रय चव्हाण, पो.हवा. राजेंद्र वानखडे, पो.हवा. नागेश दंदी, पो.शी. वैभव मोरे यांचे पथक पाठवुन आरोपीस ताब्यात घेतले.
आरोपी कडे सपोनिरी वाढवे, पोउपनिरी गोपाल जाधव, यांचे पथकाने कौशल्यपूर्वक विचारपुस केली असता, आरोपी नामे दत्ता सुदाम झाटे (वय ३३ वर्षे, रा. धमधमी ता. मालेगांव जि. वाशिम) याने पो.स्टे. पिंजर हद्दीतील वाघागड येथे मंदीर चोरी करण्याचे उद्देशाने दानपेटी सोबत छेडखानी केली होती. तसेच ग्राम खेर्डा भागाई येथील गजानन मंदीरातील दानपेटी, पो.स्टे. बार्शिटाकळी हद्दीतील खोलेश्वर मंदीर बार्शिटाकळी, करूणेश्वर महादेव संस्थान बिहाडमाथा महान, श्री. गजानन महाराज मंदीर महागाव येथील दानपेटया फोडुन त्यातुन रक्कम चोरी केल्याचे तसेच धाबा येथील स्टेट बँक ऑफ इंडीया येथील एटीएम मशीन व धाबा येथील अकोला मध्यवर्ती बँकेचे कुलूप तोडुन तेथे चोरी करण्याचा प्रयत्न केला होता असे मान्य केले.
तसेच या आरोपीने पो.स्टे. जवळका (ता. मालेगाव जि. वाशिम) येथुन दोन मोटार पंप चोरी केल्याचे व पो.स्टे. मंगरूळपिर हद्दीमध्ये दोन ठिकाणी मंदीरातील दानपेटी फोडुन चोरी केल्याचे मान्य केले आहे.
आरोपीने आज पावेतो केलेल्या तपासामध्ये एकुण 11 ठिकाणी चोरी केल्याचे कबुल केले आहे. पोलीसांनी त्याचे कडुन रोख रक्कम 10,800/- रूपये तसेच चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे ग्राईंडर मशिन, पेंनचिज व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगांवकर यांचे मार्गदर्शनात पो.नि. संतोष महाल्ले यांचे नेतृत्वात पो.स्टे. बार्शिटाकळीचे ठाणेदार संजय सोळंके, पो.स्टे. पिंजरचे ठाणेदार अजयकुमार वाढवे, पो.उप.नि. बंडु मेश्राम, स.पो.उप.निरी. रमेश खंडारे, पो.हवा. दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र वानखडे, पो.शि. वैभव मोरे, श्रीकांत आजलसांडे, गोपाल अकोटकर, चालक नागेश दंदी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि. गोपाल जाधव, स.पो.उप.नि. दशरथ बोरकर, पो.ना. गोकुळ चव्हाण, पो.शि. लिलाधर खंडारे, शेख अन्सार, चालक विजय कबले यांचे पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा