akola bar association election: अकोला बार असोसिएशन निवडणूक: अध्यक्षपदी ॲड. प्रवीण तायडे यांचा दणदणीत विजय

सहसचिवपदी ॲड. शिवम शर्मा, उपाध्यक्षपदी ॲड. देवाशिष काकड व ॲड. अरुणा गुल्हाने





ॲड. नीलिमा शिंगणे - जगड 

अकोला: अकोला बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणूक मध्ये गुरुवारी अध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत ऍड. प्रवीण तायडे यांनी 596 मते मिळवून विजय मिळवला. तर पुरुष उपाध्यक्षपदी ॲड. देवाशिष काकड 763, महिला उपाध्यक्षपदी ॲड. अरुणा गुल्हाने 525 , सहसचिवपदी ॲड. शिवम शर्मा 339 यांनी विजय मिळविला आहे.




अकोला बार असोसिएशनच्या निवडणुकीत जिल्हा न्यायालय प्रवेश द्वार क्र. 1 जवळील नवीन बार रूम येथे मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदारानी मतदान केले. निवडणुकीत अकोला बार असोसिएशनचे एकूण 1 हजार 427 मतदारांपैकी 1हजार 210 मतदानाचा  हक्क बजावला आहे. 217 अनुपस्थित राहिले. यानंतर दुपारी 4.30 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. निवडनुकित एकुण 48 मते अवैध ठरली.


प्रविण तायडे यांचा विजय 



निवडणूकित अध्यक्ष पदासाठी वरिष्ठ फौजदारी विधीज्ञ ॲड. अर्चना गावंडे, ॲड.हेमसिंह मोहता, ॲड. प्रवीण तायडे रिंगणात होते. यामध्ये ऍड. प्रवीण तायडे यांनी 592 मते घेत विजय संपादन केला. ॲड.हेमसिंह मोहता 556 मते तर ॲड. अर्चना गावंडे 52 मते घेत पराभव स्वीकारला. 7 मते अवैध ठरली.



देवाशिष काकड भरघोष मतांनी विजयी


पुरुष उपाध्यक्षपदी ॲड. देवाशिष काकड यांनी 763 मते घेत दणदणीत विजय मिळविला. त्यांनी ॲड. प्रवीणकुमार होनाळे (285), ॲड. मुरलीधर इंगळे (135) यांचा पराभव केला.  यामधे 24 मते अवैध ठरली.


ॲड. अरुणा गुल्हाने उपाध्यक्षपदी 


महिला उपाध्यक्ष पदासाठी ॲड. अरुणा गुल्हाने यांनी 525 मते घेत विजय मिळविला. ॲड. आम्रपाली गोपनारायण 365,  ॲड. कांचन शिंदे यांना 306 मते मिळाली. 11 मते अवैध ठरली.



ॲड. शिवम शर्मा विजयी



सहसचिवपदा करिता ॲड. निखिल देशमुख, ॲड. सागर जोशी, ॲड. शिवम शर्मा आणि ॲड. महेश शिंदे हे चार उमेदवार रिंगणात होते. यामध्ये ॲड. शिवम शर्मा यांनी 339 मते घेत विजय मिळविला. ॲड. निखिल देशमुख 326, ॲड. सागर जोशी 306, ॲड. महेश शिंदे 228 मते मिळविली. मते 8 अवैध ठरली.


मुख्य निवडणूक अधिकारी व निवडणूक कमिटी सदस्य ॲड. उदय नाईक यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. धीरज शुक्ला, रवि श्रीवास्तव आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या