robbery case barshitakali akl: दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश; म्होरक्या व त्याचा साथीदार अकोला पोलिसांच्या जाळ्यात





ठळक मुद्दे 

*स्थानिक गुन्हे शाखा अकोलाची कामगिरी 

*बार्शीटाकळीत घडला होता थरार




भारतीय अलंकार 24 

अकोला: बार्शीटाकळी (अकोला) पोलीस स्टेशन हद्दीत सप्टेंबर मध्ये घडलेल्या दरोडाचा  स्थानिक गुन्हे शाखा अकोलाने तपास करुन दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश मिळविले आहे. या टोळीचा म्होरक्या आणि त्याच्या एक साथीदार पोलीसांच्या जाळ्यात अडकला आहे.  यातील एकाला वैजापूर (औरंगाबाद) तर दुसऱ्याला बोरगाव पेठ (अमरावती) येथुन अकोला पोलीसांनी अटक केली आहे.




असा घडला त्या रात्री थरार


पोलीस स्टेशन बार्शिटाकळी हददीतील मांडोली येथील महीला ०६ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री घरी एकटी होती. रात्री एक वाजताचा सुमारास अचानक घराचा दरवाजा तोडुन ०६ ते ०७ अनओळखी इसमांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला. महिलेच्या तोंडामध्ये रूमाल कोंबुन चाकुचा धाक दाखवुन घरातील सोने कोठे ठेवले आहे, याबाबत दमदाटी करून घरात दोन ठिकाणी टाईल्स फोडुन धन (सोने) शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना काही मिळुन न आल्याने महिलेचे अंगावरील सोन्याचे दागिने तसेच विवो कंपनीचा मोबाईल व नगदी २२०० रूपये असा एकुन ८१,२०० रुपयेचा मुददेमाल दरोडा टाकुन जबरीने चोरी केली. याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशन बार्शीटाकळी येथे भारतीय दंड विधान कलम ३९५, ३४२  नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.




दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश 


गुन्हयाचे गाभिर्य पाहता पोलीस अधिक्षक अकोला यांनी स्थानीक गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना गुन्हयातील अनओळखी आरोपी बाबत माहीती घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते. गुरुवारी २६ जानेवारी रोजी पोलीसांना गोपनिय बातमीदार कडुन या गुन्हयातील आरोपी अर्जुन बाबुलाल राखोंडे ( वय ३५ वर्ष, रा. कवाडे नगर, भुसावळ, जिल्हा जळगांव) यास वैजापुर औरंगाबाद येथुन ताब्यात घेतले. गुन्हयासबंधाने विचापुरस करून आरोपी याचे कडुन गुन्हयात चोरी गेलेला विवो कंपनिचा मोबाईल किंमत १३ हजार मुददेमाल जप्त करण्यात आला. तसेच मुख्य आरोपी सुभाष लक्ष्मन राखोंडे (वय ३२ वर्ष, रा. बोरगांव पेठ, ता. अचलपुर जिल्हा अमरावती) यास बोरगांव पेठ येथुन ताब्यात घेवुन गुन्हयातील चोरीचे नगदी एक हजार रूपये जप्त करण्यात आले. गुन्हयातील दोन्ही आरोपीची विचारपुस केली असता, गुन्हा करतांना त्याचे सोबत इतर साथीदार असल्याचे सांगितले.



यांनी केला तपास 

ही कार्यवाही पोलीस अधिक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधिक्षक मोनिका राउत , उपविभागिय पोलीस अधिक्षक दुधगावकर यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, सहायक पोलीस निरिक्षक गोपाल ढोले, पोलीस उपनिरिक्षक गोपाल जाधव, पोलीस अंमलदार गोकुल चव्हान, लीलाधर खंडारे, अन्सार अहमद, खुशाल नेमाडे, माजिद, रवि खंडारे, अविनाश पाचपोर, मो. अमिर, गोपाल टोबरे, गणेश सोनोने, चालक अक्षय बोबडे, नफिझ, यांनी केली.

टिप्पण्या