- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola court: वाढदिवस साजरा करण्याच्या बाहाण्याने नेवून मुलीवर अतिप्रसंग; सबळ पुरावा अभावी आरोपींची निर्दोष मुक्तता
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
भारतीय अलंकार 24
अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग तसेच अतिप्रसंग केल्या प्रकरणी या खटल्यातील आरोपी नामे सोनू उर्फ प्रसेनजीत वानखडे, सह आरोपी कल्पेश गणात्रा व प्रदीप तायडे यांची अति जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सिविल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या एका अल्पवयीन मुलीला वाढदिवस साजरा करण्याचा बाहाण्याने नेऊन तिच्या सोबत अति प्रसंग केल्याची घटना सन 2016 घडली व तसी तक्रार सिविल लाईन पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. त्यानंतर आरोपी विरुद्ध कलम 354 (D) (1) (2), 376 N ,109 भा.द.वि व पोक्सो कलम 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यात सरकार पक्ष्याने 5 साक्षीदार तपासले परंतु आरोपी विरुद्ध सबब पुरावा न आढळून न आल्याने वि न्यायालयाने आरोपीची बाजू लक्ष्यात घेता आरोपीला निर्दोष मुक्त केले आहे.
आरोपी तर्फे वकील ॲड राकेश पाली ,ॲड. नागसेन तायडे,ॲड. आनंद साबळे
या खटल्यात झालेल्या सुनावनीमधे आरोपी तर्फे अधिवक्ता ॲड. राकेश रा. पाली, ॲड. नागसेन स. तायडे, ॲड. कल्याणी म. तायडे, ॲड. आनंद ग. साबळे यांनी कामकाज पाहिले.
आरोपी तर्फे ॲड. कल्याणी तायडे
अति जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा पास्को विषेश न्यायाधिश शर्मा साहेब यांनी आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीची सदरहू खटल्या मधून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा