akola court: सामुहिक अत्याचाराच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

ॲड. अलीरजा खान, ॲड. अय्युब नवरंगाबादे




भारतीय अलंकार 24

अकोला: पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे कापशी गावामध्ये एका 60 वर्षीय महिलेवर सामुहिक शारीरिक अत्याचार केल्याचा आरोपातून दोन आरोपींची पुरावा अभावी न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली.




हकीकत अशा प्रकारे आहे की, कापशी गावाचे पोलीस पाटील श्री तेजराव शेषराव चतरकर यांनी पातुर पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिला होता की, पातुर पोलीस स्टेशन हद्दीतील कापशी रोड गावा मध्ये कापशी येथे राहणारे पवन बनवारी केवट व शंकर किशोर यादव यांनी दि. 04/04/2020 रोजी रात्रीचे 12.00 वाजताचे सुमारास एका 60 वर्षाच्या महिले सोबत मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला व सदरची घटना सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यात कैद झाली होती, सदर रिपोर्टवरून त्यावेळी भा.दं.वि. कलम 354, 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता व वरील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती तेव्हा पासुन आरोपी जेल मध्ये होते. 




तपासा दरम्यान तपास अधिकारी यांना असे पुरावे आढळुन आले की, आरोपी लोकांनी त्या  वृद्ध महिलेवर सामुहिक अत्याचार केला आहे, त्यावरून आरोपीं विरूध्द भा.दं.वि. चे कलम 376(2) (जे) (एल) (एम), 376 (डी) वाढविण्यात आले होते. सदरहु प्रकरणाचा तपास पी. एस. आय. अमोल गोरे तथा पी. एस.आय. गणेश नावकार यांनी केला व तपास पुर्ण झाल्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तपासा दरम्यान तपास अधिकारी यांनी साक्षीदारांचे फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 164 अंतर्गत बयाण नोंदविले होते. 




सदरहु प्रकरणा मध्ये सरकार पक्षा तर्फे एकुण 10 साक्षीदार तपासण्यात आले, परंतु आरोपीचे वकीलांनी साक्षीदारांचे उलटतपासा मध्ये तफावत व संशय आणल्यामुळे सरकार पक्ष आरोपी विरूध्द संशयाच्या पलीकडे आरोप सिध्द करू शकले नाही व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली, सदरहु प्रकरण वि. अतिरिक्त सत्र न्यायाधिश श्री एस. जे. शर्मा अकोला यांचे न्यायालयात चालले. सदरहु प्रकरणा मध्ये दोन्ही आरोपीं तर्फे ॲड. अलीरजा खान, ॲड. अय्युब नवरंगाबादे, ॲड. अब्दुल शफीक यांनी बाजु मांडली.

टिप्पण्या