akola court: विनयभंग व पॉक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

Adv. Rakesh Pali , Adv. Nagsen Tayde & Adv.Anand Sabale 




भारतीय अलंकार 24

अकोला, दि.7 : अल्पवयीन मुलीचा विनयभंग खटल्यातील आरोपी भावेश जैन याची अति. जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली. 





खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला गाडी शिकवण्याच्या उद्देशाने तिचा विनयभंग केल्या प्रकरणीची तक्रार खदान पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. त्यानंतर आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 354, 354 अ, 504 व पॉक्सो कलम 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 





या खटल्यात सरकार पक्षाने 8 साक्षीदार तपासले. परंतु विद्यमान न्यायालयाने आरोपीची बाजू लक्षात घेता आरोपीला निर्दोष मुक्त केले आहे. या खटल्यात झालेल्या सुनावणीमध्ये आरोपी तर्फे ॲड. राकेश रा. पाली, ॲड. नागसेन स. तायडे, ॲड. कल्याणी म. तायडे, ॲड. आनंद ग. साबळे यांनी कामकाज पाहिले. अति जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा पॉकसो विषेश न्यायाधिश गोगरकर यांनी आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीची सदरहू खटल्या मधून निर्दोष मुक्तता केली.

टिप्पण्या