walkathon:बालकांच्या हक्कासाठी चालली हजारो पावले! तिक्ष्णगतद्वारे आयोजित ऐतिहासिक वॉकेथाॅनला उदंड प्रतिसाद



ठळक मुद्दा 

तिक्ष्णगत क्रिकेट करंडकाची शानदार सुरुवात



भारतीय अलंकार 24

अकोला : बालकांवरील अन्याय, अत्याचाराच्या वाढत्या घटनांकडे आपले लक्ष वेधण्यासाठी आणि समाजात बालकांप्रति संवेदना जागृत करण्यासाठी तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष सुगत वाघमारे यांच्या वतीने शनिवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक वॉकेथॉन 'वॉक फॉर चाईल्ड' या उपक्रमाला आबालवृद्ध यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. बालकांच्या हक्कासाठी यावेळी हजारो पावले चालली.   


                     

शनिवारी सकाळी सिव्हिल लाईन येथील बालस्नेही पोलीस केंद्र सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन परिसरातून आरंभ झालेल्या 'वॉक फॉर चाईल्ड' वाॅकेथाॅन रॅलीला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून सदस्य सचिव जिल्हा विधिसेवा प्राधिकरण  न्या.योगेश पैठणकर,महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षणआयोग ऍड. संजय सेंगर,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  विलास मरसाळे ,जिल्हा बाल सरक्षण कक्ष अधिकारी राजू लाडूलकर,  अकोला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वारे  सहायक कामगार आयुक्त राजू गुल्हाने जिल्हा सामान्य रुग्णालय डॉ.मीणा शिवाल , पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस निरीक्षक सिव्हिल लाईन कांबळे , अखिल भारतीय क्षत्रिय महासंघाचे अध्यक्ष अजय सेंगर आदी मान्यवर उपस्थित होते. 




वाॅकेथाॅनचा समारोप शास्त्री स्टेडियम येथे करण्यात आला.  याठिकाणी गुंफाबाई ग्यानेश्वर वाघमारे स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित तिक्ष्णगत करंडक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलीस आयुक्त संदीप घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी खेळाडूंना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शुभेच्छा प्रदान केल्या,  वाॅकथाॅन स्पर्धेमध्ये जागर फाउंडेशन, चाईल्ड लाईन अकोला,भारत विद्यालय, सन्मित्र विद्यालय, जसनागरा विद्यालय, सत्यसाई सेवा समिती अकोला शहरातील सर्व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, इमेजेस IMA अकोला, LNP कॉनमेंट शिवणी,समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यार्थी, लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाचे पदाधिकारी, LIC अकोला,अमृत कलश विद्यालयाचे विद्यार्थी, ज्ञान कलश विद्यालयाचे विद्यार्थी,अजय वाहूरवाघ फिजिकल अकॅडमी अकोला,मानव उद्धार सामाजिक संस्था मुंबई,सिंचित वनचा गृप, पिंकेथॉन ग्रुप अकोला , मानव अधिकार फोरम अकोला,गाडगेबाबा सेवा समिती अकोला,तसेच विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.   




स्पर्धेत सामील सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र देण्यात आले. उपस्थित सर्वांचे सुगत वाघमारे यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी, चाईल्ड लाईन, रेल्वे चाईल्ड लाईनचे पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पण्या