- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ved-marathi-movie-vasant-akl: रितेश जेनेलियाचा बहुप्रतिक्षित ' वेड ' चित्रपट उद्यापासून ' वसंत ' मध्ये
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
भारतीय अलंकार 24
अकोला: मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा- देशमुख या जोडीचा अभिनित मराठी चित्रपट रसिकांना मंत्रमुग्ध करत वेड लावणार आहे. बहुप्रतिक्षित ‘वेड’ चित्रपट उद्या सर्वत्र प्रदर्शित होत असून अकोलेकर रसिकांना हा चित्रपट वसंत सिनेमागृह येथे बघता येणार आहे.
वेड चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. वेडच्या टीझरला सुध्दा प्रेक्षकांनी खुप पसंत केले आहे. अजय अतुलच्या गाण्यांना तर अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. तर भाईजान सलमान खान सुध्दा चित्रपटात पाहुणा कलाकार आहे. असा बहुप्रतिक्षित “वेड” चित्रपट उद्या शुक्रवार 30 डिसेंबर रोजी अकोला शहरातील वसंत टॉकीजमधे हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपट रसिकांना भरपूर आनंद घेता येईल,अशी तयारी करण्यात आली आहे.
’वेड’ सिनेमाच्या टीझरमध्ये रितेशचा गंभीर लुक, बीचवरचे शूट आणि डायलॉगने प्रेक्षकांना खरोखरच वेड लावले. सिनेमाचे टायटल सॉंग आले.
रितेश आणि अभिनेत्री जिया शंकर यांच्यावर हे रोमान्टिक गाणे चित्रित करण्यात आले आहे. वेड गाण्याचे म्युझिक, शूट लोकेशन आणि रितेश जियाची केमिस्ट्री बघून चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली होती. नंतर आलेले बेसुरी हे गाणेही प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे. त्यामुळे आता वेड काय धमाका करतो हे कळेलच.
वेड हा सिनेमा उद्या 30 डिसेंबर रोजी वसंत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘वेड’ हा जेनेलियाचा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून जेनेलिया डिसूझा यांनीच चित्रपट निर्मिती केली आहे. तर रितेश पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहे.
वेड हा रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. वेड हा 2019 च्या तेलुगू भाषेतील मजिली चित्रपटाचा अधिकृत रिमेक असल्याचे म्हंटल्या जाते.
"वेड चित्रपटाचे वसंत सिनेमागृह मधे उद्या शुक्रवार 30 डिसेंबर पासून दररोज 4 खेळ होणार असून, दुपारी 12.30, 3.30, सायंकाळी 6.30 आणि रात्री 9.30 वाजता अशी वेळ राहणार आहे. सिनेमाचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अडव्हान्स बुकिंग सुरू आहे. तसेच वेळेवरही तिकीट उपलब्ध राहील."
श्याम पडगीलवार
व्यवस्थापक,
वसंत सिनेमागृह.
अकोला
वसंत सिनेमागृह
वेड चित्रपट
ajay atul
genelia d'souza
marathi movie
ritesh deshmukh
Vasant talkies
Ved
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा