shivsena bjp akola political: शिवसेनेला जेष्ठ नेते विजय मालोकर यांचा ' जय महाराष्ट्र '... भाजपात केला अधिकृत प्रवेश



भारतीय अलंकार 24

अकोला: काही दिवसांपूर्वी अकोल्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पक्षाचे जेष्ठ नेते विजय मालोकर यांनी ' जय महाराष्ट्र ' केलं होतं. मालोकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र आज भाजपचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत मालोकर यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. मालोकर हे ठाकरे शिवसेना प्रणीत 'महाराष्ट्र एसटी कामगार सेने'चे प्रदेश कार्याध्यक्ष होते. पक्षातील वरिष्ठांच्या दुर्लक्षित धोरणांना कंटाळून मालोकारांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.


विजय मालोकार यांचा भाजपमध्ये प्रवेश 


 

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा एसटी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष व अकोला जिल्ह्यातील विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले लोकप्रिय नेतृत्व विजय मालोकार याणी रविवार द 25 डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.


भारतीय जनता पक्षाचे कार्यालयात डॉ. टोपले सभागृहात हा पक्ष प्रवेश समारंभ रविवारी सकाळी 11 वाजता आयोजित केला होता. विजय मालोकार यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला. आणि रविवारी सकाळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.



पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून भारतीय जनता पक्ष ची वाटचाल 51% मताधिक्य मिळवण्याच्या कडे सुरू असून समाजातील सर्व घटकांना एकरूप करून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश हा भारतीय जनता पक्षाचा कामाचा व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न असून विजय मालोकार यांचा कर्तुत्वाचा व त्यांच्या संघटन कौशल्याचा अकोला जिल्हा भाजपा योग्य वापर करून पक्षविस्तारासोबत समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल असा विश्वास प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर  यांनी व्यक्त केला.

कामगार तसेच शेतकरी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने तीस वर्षापासून कार्यरत विजय मालोकार यांनी महाराष्ट्र एसटी संघटनेचा कार्याध्यक्ष चा पदाचा राजीनामा देऊन प्रत्येक जनता पक्षामध्ये प्रवेश केला याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष  भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल हे होते तर मंचावर श्रावण इंगळे तेजराव थोरात चंद्रशेखर पांडे गुरुजी किशोर मांगटे पाटील, अर्चना मसने, अंबादास उमाळे, रमण जैन, अशोक गावंडे, राजेश बेले, डॉक्टर किशोर मालोकार, माधव मानकर संजय गोडफोडे राजेश आप्पा खोबरे, शंकरराववाकोडे उपस्थित होते.



हिंदुत्व तसेच विकासाच्या राजकारणासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आपण प्रवेश केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल , विजय  अग्रवाल आदींच्या नेतृत्वात समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी व कामगारांच्या प्रश्नासाठी आपण सदैव तत्पर राहू अशी ग्वाही विजय मालोकार यांनी देऊन स्वाभिमान तसेच सर्वांना आदर भाव घेऊन आपण कार्यरत राहू याप्रसंगी विजय मालोकार म्हणाले. 




यावेळी आमदार सावरकर यांच्या हस्ते विजय संकल्प कलेडर विमोचन करण्यात आले. विजय अग्रवाल सातत्याने विजय संकल्पच्या माध्यमातून दहा हजार कॅलेंडर घरोघरी पोहोचण्याचा काम करत असतात याचा विमोचन करण्यात आला. यावेळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आला तसेच अटलजी यांचे जीवन चरित्राचे वाचन करून कार्यकर्त्यांनी वाटचाल करावी, अशीही याप्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन माधव मानकर तर प्रास्ताविक अंबादास उमाळे तर आभार प्रदर्शन अमोल साबळे यांनी केले.


टिप्पण्या