shaurya yatra akola old city: धर्मांतर विरोधी कायदा त्वरित करावा - चेतन महाराज; श्रीराजराजेश्वर मंदिरापासून निघाली शौर्य यात्रा




ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: लव्ह जिहाद समुळ नष्ट करून धर्मांतर विरोधी कायदा राज्य शासनाने त्वरित करावा, अशी मागणी महाकाली उपासक चेतन महाराज यांनी केली.



रविवारी जुने शहरातील मांगीलाल शर्मा शाळा प्रांगणात विश्व हिंदू परिषदे तर्फे आयोजित धर्मसभेत चेतन महाराज बोलत होते.




राज्यात दिवसेंदिवस लव्ह जिहादच्या माध्यमातून युवतींना फसविण्याच्या आणि जीवे मारण्याचे प्रकार घडत  आहे. आर्थिक आमिष, प्रलोभने, भावनिक जाळे आणि बळजबरी आदी  माध्यमातून युवतींचे धर्मांतर करण्यात येत आहे, या गैरकृत्याना आळा घालण्यासाठी याआधी बरेचदा  संघटनांकडून प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. मात्र शासनाचे या गंभीर मुद्द्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासाठीच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गिता जयंतीचे औचित्य साधून २५ डिसेंबर रोजी शौर्ययात्रा व धर्मसभेचे आयोजन करण्यात आल्याचे मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.


व्यासपीठावर विहिंपचे प्रांत कोषाध्यक्ष राहुल राठी, जिल्हाध्यक्ष प्रकाश लोढीया, हभप गोंडचवर महाराज, विभागमंत्री सुरज भगेवार, महानगर उपाध्यक्ष प्रकाश घोगलिया, डॉ. प्रवीण चौहान होते. सभेचे संचालन सुरेंद्र जयस्वाल यांनी केले. आभार नीलेश पाठक यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय संयोजक हरिओम पांडे यांनी करुन दिला.



यात्रेत व सभेत  प्रताप वीरवाणी, संदीप निकम, सुधाकर बावसकर, आशीष भिमजीयानी, प्रेम आमकर, प्रफुल्ल पांडे, संतोष बोर्डे, विजय डहाका, शुभम थोटांगे, राहुल वाघमारे, जय तवारी, सिद्धार्थ जयस्वाल, आकाश गावंडे, पप्पू रणदिवे, अमोल आखरे, तुलसी महाराज मसने आदी सहभागी झाले होते. यावेळी हिंदू जनजागृति समितीच्या ॲड. श्रुती भट्ट यांनी यात्रेचे स्वागत केले.


श्रीराजेश्वराच्या साक्षीने शौर्य यात्रा 


तत्पूर्वी श्रीराजराजेश्वर मंदिर पासून  बजरंग दलातर्फे शौर्य यात्रा काढण्यात आली. विट्ठल मंदीर, श्रीवास्तव चौक, शिवाजी नगर भाजी बाजार, डाबकी मार्ग ही यात्रा वानखडे नगरातील मांगीलाल शर्मा विद्यालयात पोहचली. याठिकाणी यात्रेचे रुपांतर विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित धर्मसभेत झाले. 



तरुणाईचा लक्षणीय सहभाग 

यात्रा आणि धर्मसभेत तरूणाईचा सहभाग लक्षणीय होता. जय श्रीराम, छत्रपति शिवाजी महाराज की जय घोष करीत आणि लव्ह जिहाद विरोधी घोषणाबाजी करीत तरुणाईने यात्रा मार्ग दणादून सोडला होता.



आकर्षक रथ 


यात्रेच्या प्रारंभी श्रीराम, श्री लक्ष्मण, सीता माता, श्रीहनुमान ची आकर्षक मूर्तीने सज्ज रथ होता. यामागे भगवा ध्वज धारक यात्रेत सहभागी झाले होते. यात्रेचे स्वागत नागरिकांनी ठिकठिकाणी केले.


टिप्पण्या