- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अपघात ग्रस्त कार
ठळक मुद्दा
ठार मध्ये एक महिला आणि एक बालक. मृतक हे नागपूर येथील असल्याची माहिती
भारतीय अलंकार 24
अकोला: मुंबई वरून नागपूरकडे जात असलेल्या चार चाकी गाडीचा भीषण अपघात समृध्दी महामार्गावर मंगळवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास घडला. कारंजासमोर नागपूर कडे जाताना दहा किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. अपघाता मध्ये दोन जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अकोला सर्वोपचार रुग्णालय शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
ठार झालेल्या मध्ये एक महिला आणि एक बालकाचा समावेश आहे. मृतक हे नागपूर येथील असल्याचे समजते. कार चालकास डुलकी लागल्यामुळे अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. अपघात एवढा भीषण होता की मृतक बालक मुलगी ही कारच्या बाहेर उडून समृद्धी हायवे रोडच्या बाजूला म्हणजेच खाली शंभर फूट अंतरावर जाऊन पडली होती. तिला शोधण्यासाठी गावकऱ्यांना एक ते दीड तास लागला. बाजूला असलेल्या गवतामुळे ती दिसण्यास विलंब झाला. पण ती दिसली त्यावेळेस पर्यंत तिचा मृत्यू झालेला होता.
अपघाताची माहिती मिळताच समृद्धी हायवे लोकेशन 108 श्री जय गुरुदेव रुग्णवाहिका रुग्णसेवक विशाल डांबरे मातोश्री रुग्णवाहिका रुग्णसेवक विधाता चव्हाण समृद्धी रुग्णवाहिका अजय घोडेस्वार ग्रामपंचायत विळेगाव रुग्णवाहिका रुग्णसेवक अमोल गोडवे नवनिर्माण रुग्णवाहिका विनोद खोंड श्री गुरमंदिर रुग्णवाहिका रुग्णसेवक रमेश देशमुख तातडीने पोहचले.
कु आरोही जोशी 14 वर्ष, एडवोकेट अजय जोशी 52 वय गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. हे गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा