akola crime: हरिहर पेठेत जुन्या वादातून शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रावर प्राण घातक हल्ला; पाच ते सहा आरोपी ताब्यात





भारतीय अलंकार 24

अकोला: उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रावर 4 ते 5 जणांनी हल्ला केला होता. जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हरिहर पेठ येथे आज ही घटना घडली. जुन्या वादातून चार ते पाच जणांनी राजेश मिश्रा यांना पाईपने जबर मारहाण केली आहे.



राजेश मिश्रा यांना मारहाण होतांना पहात राजेश मिश्रा गटाचे काही सदस्यांनी परस्परविरोधीवर हल्ला चढविला. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दोन्ही गटांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनाही मारहाण झाली. यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी राजेश मिश्रासह 5 जणांना ताब्यात घेतले आहे.  जुने शहर पोलिसांनी राजेश मिश्रासह दुसऱ्या 5 सदस्याविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या घडलेल्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता..पोलिसांनी मात्र या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.


असे घडले प्रकरण 

अकोला जुने शहरातील हरिहर पेठ भागात आज रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास दोन गटात हाणामारी असल्याची माहिती जुने शहर पोलिसांना मिळाली. पोलीस क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले. शिवसेना ठाकरे गटाचे अकोला महानगराध्यक्ष राजेश मिश्रा आणि प्रवीण अहीर गटात किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी सुरू होती. हाणामारीत दोन्ही गटातील सदस्यांच्या हातात लाठ्या काठ्या, लोखंडी पाईप, तलवारी होत्या. हाणामारीत राजेश मिश्रा यांच्या नाकाला आणि हाताला दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू असून अजून एक जखमी झाला आहे.  अहीर गटातील दोन ते तीन लोक जखमी झाले असल्याचे समजते. 



 

दरम्यान वाद मिटवण्यासाठी आलेल्या पोलिसाला देखील लाठीचा मार बसला. पोलीस कॉन्स्टेबल शेख रशीद यांच्या डोक्यावर लाठीचा वार झाला. पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचा या घटनेत चष्मा तुटला. 


हरिहर पेठ हा अतीसवेंदनशील भाग आहे.पोलिसांनी घटनास्थळी लगेच हजेरी लावल्याने होणारी मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत पाच ते सहा आरोपींना ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. तसेच जुने शहर पोलीस ठाण्यात दंगलीचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

टिप्पण्या