wildlife-bird-photography-exhibition: खासदार मुकुल वासनिक यांच्या वन्यप्राणी व पक्षी फोटोग्राफी प्रदर्शनीला व -हाडासह देशविदेशातील नामांकितांची भेट

प्रदर्शनीतील छायाचित्रांची पाहणी करतांना खा. मुकुल वासनिक, डॉ. सुधीर ढोणे व अन्य





भारतीय अलंकार 24

मुंबई: माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभा सदस्य खासदार मुकुल वासनिक यांनी वन्यप्राणी व पक्षी यांची स्वत: काढलेल्या छायाचित्रांची प्रदर्शनी मुंबईत जहाँगिर आर्ट गॅलरीत संपन्न झाली. या प्रदर्शनीत देश-विदेशातील नामांकीत कलावंत, उद्योगपती, राजकीय नेते, राजदूत यांच्यासह अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी भेट दिली.  




खा. मुकुल वासनिक यांनी देश-विदेशातील विविध जंगलात वन्यप्राणी व पक्षी यांची स्वत: छायाचित्रे काढलेली आहेत. त्यामध्ये राजस्थानातील रणथंबोर, ताल छापर, झालना, भरतपूर व चारू, महाराष्ट्रातील ताडोबा व भीगवन, टांझानीया अभयारण्य, आसाममधील काझीरंगा, उत्तराखंडमधील कॉरबेट नॅशनल पार्क, चोप्ता व चंद्रशिला, केरळमधील वायनाड, गुजरातमधील लिटील रण ऑफ कच्छ, कर्नाटकातील काबीनी, दिल्लीतील ओखला आदी जंगल व अभयारण्यात काढलेल्या ७६ छायाचित्रांचा समावेश आहे.




विविध वन्यप्राणी व पक्षी यांच्या छायाचित्रांच्या बाजूला संबंधीत वन्यप्राण्यांचे, पक्षांचे नांव व ते कोणत्या जंगलात काढले याविषयी माहिती असलेले स्टीकर स्वत: खा. मुकुल वासनिक यांनी संबंधीत छायाचित्राच्या बाजूला लावले. यावरून प्रत्येक प्राणी व पक्षी यांचे नांव व छायाचित्र काढल्याचे ठिकाण याविषयी मुकुल वासनिक यांना असलेली माहिती बघुन त्यांच्यातील दर्जेदार छायाचित्रकार व वन्य प्रेमी कलावंत दिसून आल्याची प्रतिक्रीया उपस्थित मान्यवरांनी दिली.  



बॉम्बे आर्ट सोसायटीचे माजी चेअरमन विट्ठल लोखंडकार याच्या समन्वयातून आयोजित या फोटोग्राफी प्रदर्शनीला खा. सुप्रिया सुळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप, प्रसिध्द उद्योगपती यश बिर्ला, उद्योगपती विजय कलंत्री, बॉम्बे आर्ट सोसायटीचे सचिव चंद्रजीत यादव, जहॉगिर आर्ट गॅलरीच्या सेक्रेटरी श्रीमती के. जी. मेनन, मुंबईतील कौकन्सलेट जनरल ऑफ रशियन फेडरेशनचे वरिष्ठ सल्लागार सरजे मेशचेरयाकोव्ह, केनियन उच्चायुक्त विली बेट, मध्यप्रदेशचे माजी मंत्री कमलेश्वर पटेल, माजी मंत्री सुरेश शेट्टी, आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. अभिजीत वंजारी, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजन वेळूकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भा. ई. नगराळे, विजय अंभोरे, संजय राठोड, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, सचिव रामविजय बुरूंगले, डॉ. झिशान हुसेन, दीपक काटोले, सुनिल अहिरे, प्रमिल जाधव, रोमिल रॉड्रीक्स, दुष्यंत भट, सुरेश मोगल, अशोक दाभाडे, डिगांबर मवाळ, राकेश पाटील, कुमार खिलारे, चंद्रजित यादव, शेखर चने, डॉ. सिंगल, राजस्थानचे प्रसिध्द कलावंत पुण्याजी, भूपेंद्र गुप्ता, सुभाष मुळे, दिनेश वाघमारे, भूपी गुप्ता, संदेश कोंडविलकर, कुमार खिलारे, अशोक दाभाडे, गणेश शेगर,  माजी आमदार शशिकांत खेडेकर, प्रा. संतोष आंबेकर, कासम गवळी, शाम राठी, निवृत्ती तांबे, अताउल्लाह जमादार, फिरोज खान, पदम पाटील, शैलेश खेडकर, भूषण ताले पाटील, प्रमोद अवसरमोल, अभिजीत अंभोरे, प्रमिलाताई उके, सुशिलकुमार सोनुने, गजानन आंधळे, वा. रा. पीसे, सुमित अहिरे, सिध्दार्थ हत्तीअंबेरे यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या.





आजपासून पक्षी सप्ताह; विविध कार्यक्रमांचे आयोजन 

फाईल फोटो



अकोला : वनविभागाच्या वतीने शनिवार ५ ते शनिवार १२ नोव्हेंबर पर्यंत पक्षी सप्ताहाचे (Bird week) आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त अकोला वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन्यजीव विभाग यांनी मिळून विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाह उपवनसंरक्षक अर्जूना के.आर यांनी केले आहे.


शनिवार दि.५ रोजी वन्यजीव अभ्यासक साहित्यिक  मारुती चित्तमपल्ली यांचा जन्मदिवस आहे.  तर दि. १२ नोव्हेंबर रोजी पक्षी अभ्यासक डॉ. सलिम अली यांची जयंती आहे. या पार्श्वभुमिवर दि.५ ते दि.१२ नोव्हेंबर हा सप्ताह पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने अकोला जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ते याप्रमाणे-


            

शनिवार दि.५ रोजी सकाळी आठ वा. प्रभात फेरी वन विभागाचे विभागीय कार्यालय ते टॉवर चौक- दुर्गा चौक- आकाशवाणी चौक – पुन्हा परत विभागीय कार्यालय व मारुती चित्तमपल्ली यांच्या कार्याची ओळख. रविवार दि.६ रोजी सकाळी सात वा. काटेपूर्णा अभयारण्य, माळराजुरा तलाव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर येथे पक्षी निरीक्षण व गणना. सोमवार दि.७ रोजी सकाळी १० वा. वनविद्या महाविद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे अकोला जिल्ह्यातील पक्षी याविषयावर सादरीकरण, मंगळवार दि.८ रोजी सकाळी १० वा. पत्रकार भवन अकोला येथे पत्रकारांसाठी पक्षी निरीक्षण कार्यशाळा, बुधवार दि.९ रोजी सकाळी सात वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर येथे पक्षी निरीक्षण, गुरुवार दि.१० रोजी चौंढी तलाव परिसर आलेगाव परिक्षेत्र येथे पक्षी निरीक्षण व गणना, शुक्रवार दि.११ रोजी सकाळी ७ वा. कापशी तलाव, मच्छी तलाव, आखतवाडा, काटेपूर्णा तलाव, माळराजुरा तलाव, चौंढी तलाव परिसरात स्वच्छता मोहिम,  शनिवार दि. १२ रोजी सकाळी आठ वा. स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यान  वाशिंबा येथे पक्षी सप्ताह समारोप व डॉ. सलिम अली यांच्या कार्याची ओळख.


या सर्व कार्यक्रमांना पक्षी अभ्यासक, पक्षी प्रेमी, नागरिक, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपवनसंरक्षक अर्जून के.आर. यांनी केले आहे.


 


          




टिप्पण्या