vidarbha cricket team - akola club: अथर्व तायडे, दर्शन नळकांडे, नयन चव्हाण विदर्भ क्रिकेट संघात





भारतीय अलंकार 24 

अकोला: कोलकाता येथे बी.सी.सी.आय अंतर्गत १२ नोव्हेंबर पासुन सुरू होणाऱ्या एक दिवसीय विजय हजारे क्रिकेट स्पर्धेकरिता विदर्भ क्रिकेट संघाची घोषणा झाली असून, संघात अकोला क्रिकेट क्लबच्या अथर्व तायडे व दर्शन नळकांडे या खेळाडूंची निवड असून अथर्व तायडेकडे विदर्भ संघाची पुन्हा उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली. दोन्ही खेळाडूंनी मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. स्पर्धेत विदर्भ संघाने उपांत्यफेरी पर्यंत मजल मारली होती.



अथर्व तायडे हा सलामीला खेळणारा डावखुरा शैलीदार फलंदाज असून यापूर्वी त्याने १६, १९, २३ वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व तसेच १९ व २३ वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे तसेच रणजी ट्रॉफी व भारतात सर्वात प्रतिष्ठीत असणारी इराणी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व केले असून अथर्वच्या नेतृत्वात विदर्भ संघ हा १९ बर्षीय स्पर्धेत अजिंक्य राहिला असून यावर्षी आय.पी.एल स्पर्धेत अथर्वने पंजाब किंग्स संघाकडून खेळताना आय. पी. एल स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले आहे.  



दर्शन नळकांडे हा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाज असून यापूर्वी दर्शनने १६, १९, २३ वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग संघाने प्रतिनिधित्व केले आहे तसेच १९ वर्षाखालील भारतीय संघाचे इंगलंड येथे प्रतिनिधित्व, रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.  तीन वर्ष त्याने किंग्स एलेवन पंजाब संघा कडून आय.पी.एल. स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले तर यावर्षी आय. पी. एल स्पर्धेत अजिंक्य पद प्राप्त गुजरात टायटन संघाचे प्रतिनिधित्व करून दोन सामन्या उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करून ४ बळी घेतले.



विदर्भ संघ ग्रुप "बी" मध्ये असून त्याचा सामना ग्रुप मधील दिल्ली, आसाम, राजेस्थान, कर्नाटक, मेघालय, सिक्कीम व झारखंडम या संघासोबत होईल. गेल्या ८-९ वर्षात क्लबच्या खेळाडूंनी खेळात सातत्य ठेवून अकोला क्रिकेट क्लब, जिल्हा तथा विदर्भाचे नाव राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्तरावर नेले.  





नयन चव्हाण २५ वर्षाखालील विदर्भ क्रिकेट संघात 


२० नोव्हेंबर  पासून राजकोट येथे सुरु  होणाऱ्या २५ वर्षाखालील एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेकरिता विदर्भ क्रिकेट संघाची घोषणा झाली असून अकोला क्रिकेट क्लबचा नयन चव्हाणची विदर्भ संघात निवड झाली आहे.  साखळी पद्धतीने सामने होणार असून विदर्भाचा सामना त्यांच्या ग्रुप मध्ये असलेल्या मुंबई, ओरिसा, जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड व राजस्थान या संघासोबत होईल. नयन चव्हाण शैलीदार फलंदाज व फिरकीपटू आहे. यापूर्वी नयनने १४, १६, १९ व २३ वर्षाखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच १९ वर्षाखालील भारतीय रेड संघाचे सुद्धा प्रतिनिधित्व केले आहे.

नागपूर येथे "बापुना कप" निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा झाली असून स्पर्धेत नयनने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करून उत्कृष्ट फलंदाज म्हणून मान मिळविला. 



खेळाडूंच्या निवडी बद्दल त्यांचे अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव विजय देशमुख, सहसचिव कासम खान, ऑडीटर दिलीप खत्री, कर्णधार भरत डिक्कर, सदस्य ओमप्रकाश बाजोरिया, अशोक तापडिया, देवा शर्मा मार्गदर्शक - ॲड. मुन्ना खान, माजी कर्णधार विवेक बिजवे, क्रीडा परिषद  सदस्य जावेद अली, परिमल कांबळे, प्रशिक्षक सुमेद डोंगरे, अमित माणिकराव, शारिक खान, एस.टी. देशपांडे, अभिजित मोरेकर, अभिजित करणे, किशोर धाबेकर तसेच अकोला क्रिकेट क्लब व जिल्हा हौशी क्रिकेट संघटना अकोलाच्या खेळाडूंनी त्यांचे अभिनंदन करून स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या