property tax: मालमत्ता कराची शास्ती म्हणजे भाजप शासनाने नागरिकांना फासावर लटकवण्यासारखे -मदन भरगड


 



भारतीय अलंकार 24

अकोला- राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच अमरावती येथील मालमत्ता करास स्थगिती दिली आहे. तर दुसरीकडे अकोला मनपा अंतर्गत मालमत्ता कराची शास्ती वसुली सुरू असून नागरिकांनी कराचा भरणा केला नाही तर त्यांची मालमत्ता शास्ती करण्याचे कारस्थान सत्तारूढ भाजप सरकार करीत आहेत. शास्ते लावून सुरू असलेली करवसुली ही नागरिकांना फासावर लटकवण्याचा प्रकार असून भाजप शासनाने त्वरित ही शास्ती रद्द करावी अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी व माजी महापौर मदन भरगड यांनी दिला. 



मनपा प्रशासन नागरिकांना शासकीय लावून सक्तीची वसुली करण्याच्या कामात गुंतले असून या शास्तीच्या अनावश्यक प्रकारामुळे नागरिकांची आर्थिक ससेहोलपट होत आहे.भाजप सरकार एकीकडे अन्य शहरात वाढीव करास स्थगिती देत आहे, तर दुसरीकडे शास्ती लावित कर वसुली करीत आहे. महागाईने आधीच बेजार झालेल्या नागरिकांवर शास्ती लावून कर भरण्याचा प्रकार म्हणजे नागरिकांना फासावर लटकवण्याचा प्रकार असल्याचा आरोप भरगड यांनी करीत या संदर्भात अभिनव आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात केला आहे.

टिप्पण्या