political visit: shivsena -bjp-akola: शिवसेना नेते आदित्य ठाकरे व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे सोमवारी राजराजेश्वर नगरीत आगमन





भारतीय अलंकार 24

अकोला: शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच भाजपा महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश नवनिर्वाचित अध्यक्ष चित्रा वाघ यांचे राजराजेश्वर नगरीमध्ये सोमवारी 7 नोव्हेंबर सोमवार रोजी आगमन होत आहे. दोन्हीं नेत्यांच्या स्वागतासाठी दोन्हीं पक्षाचे कार्यकर्ते सज्ज झाले असून उत्सहाचे वातावरण तयार झाले आहे.



आदित्य ठाकरे यांचा दौरा 


शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे 7 नोव्हेंबर रोजी राजे राजेश्वर नगरीत आगमन होणार आहे. आदित्य ठाकरे यांचे सकाळी 9 वाजता शिवणी विमानतळ येथे आगमन होत आहे. यावेळी स्वागता करिता सर्वसामान्य जनता व शिवसैनिक युवा सैनिक महिला शिवसैनिक शेतकरी बांधव यांनी विमानतळवर बहुसंख्यने उपस्थित राहुन भव्यदिव्य स्वागत करणार आहेत. 



त्यानंतर तेथून शिवर, नेहरू पार्क अशोक वाटीका, गांधी चौक, जयहिंद चौक मार्गे  अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वरांचे दर्शन घेऊन व्याळा मार्गे 10 वाजता बाळापूर येथे भव्य सभेला आदित्य ठाकरे संबोधित करतील. सभेला जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक शेतकरी बांधवानी उपस्थित राहावे,असे आवाहन सह संपर्क प्रमुख सेवकराम ताथोड, आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हा प्रमुख मुकेश मुरूमकार यांनी केले आहे.




चित्रा वाघ यांचा दौरा


अकोला: भारतीय जनता पक्षाच्या अभ्यासू नेतृत्व मातृ शक्तीच्या सन्मानासाठी सातत्याने लढा देणाऱ्या भाजपा महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या नवनिर्वाचित अध्यक्ष चित्रा वाघ राज राजेश्वर नगरीमध्ये 7 नोव्हेंबर सोमवार रोजी येत असून नगरसेविका मनिषा भन्साळी यांच्या निवासस्थानी भेट देऊन दौरा प्रारंभ करणार आहे. 



आठ नोव्हेंबर मंगळवार रोजी नगरसेविका सारिका जयस्वाल यांच्या निवासस्थानी भेट देऊन सकाळी साडे दहा वाजता अकोला महानगर व ग्रामीण भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ता नगरसेविका बूथ प्रमुख यांच्याशी संवाद साधून बैठकीला संबोधित करणार आहे. 



भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या नेत्या व भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल व सुनिता अग्रवाल यांच्या निवासस्थानी भेट देऊन दुपारी साडेतीन वाजता स्थानिक सर्किट हाऊस पत्रकारांशी संवाद साधणार आहे, अशी माहिती कुसुम भगत , फुंडकर जयश्री, चंदा शर्मा, चंदा ठाकूर अर्चना मसने, अश्विनी हातवळणे, सुमन गावंडे, मोनिका गावंडे योगिता पावसाळे, गीतांजली शेगोकार, वैशाली शेळके, रश्मी कायंदे यांनी दिली.

टिप्पण्या