chitra wagh-bjp-akola-visit-political: महिलांचा अपमान ही महाराष्ट्राची संस्कृती नाही- चित्रा वाघ





नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन नाहीच. पण महिलांचा अपमान झाल्यावर निवडक नेत्यांविरोधातच संताप कितपत योग्य आहे? कंगना रनौत, स्वप्नाली पाटकर, केतकी चितळेबद्दल आवाज का उठवला नाही? महिलांचा अपमान ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, त्यामुळे अशा वक्तव्याचे समर्थन नाहीच. सगळ्यांनीच भान ठेवा. असे वक्तव्य भाजपा महिला आघाडीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.



अब्दुल सत्तार यांनी अलीकडेच केलेल्या एका आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीच्या आक्रमक कार्यकर्त्यांकडून अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी आपली भूमिका स्पष्ट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांची आठवण करून दिली. चित्रा वाघ अकोला जिल्हा दौऱ्यावर मंगळवारी होत्या. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.


चित्रा वाघ यांनी हाच मुद्दा पुढे नेत  संजय राऊत यांचा स्पष्ट उल्लेख करत म्हणाल्या की, गेल्या अडीच वर्षांत काही का केलं नाही? संजय राऊतांवर का गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत? एका अभिनेत्रीला हरामखोर म्हणणे हे योग्य आहे का? स्वप्ना पाटकर महाराष्ट्रातील मुलगी नव्हती का? त्यांच्यावर बोलल्यानंतर संजय राऊतांवर का गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत? असा सवाल करीत क्षेत्र कुठलेही असो प्रत्येक पुरुषांनी महिलेचा आदर- सन्मान केला पाहिजे, महिलांनीही व्यक्त होत बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, अशी पुष्टी चित्रा वाघ यांनी जोडली 



महाविकास आघाडी  सरकार घरी बसून काम करणारे ऑनलाइन सरकार होते, अशी टीका करीत महिलांच्या स्वावलंबनासाठी बचतगटांना जोड म्हणून हे शिंदे फडणवीस सरकार नवनवीन योजना आणणार आहे. शेतकरी, कष्टकरी महिलांच्या उन्नतीसाठी देखील हे सरकार काम करणार असल्याचे सांगत, मागील अडीच वर्षाच्या काळात राज्याची वाताहत झाली, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

मविआ सरकारच्या काळात अत्याचार, शेतकरी आत्महत्या, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न उभे राहिले. मात्र, शिंदे, फडणवीस सरकार येताच एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला हे अचानक झाले, नसून हा नेतृत्वाचा फरक असल्याचे वाघ म्हणाल्या. 

येत्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक मतदान केंद्रावर पुरुषांसोबतच महिला असणार आहेत. प्रत्येक बुथ वर 25 महिला राहणार असल्याचे सांगुन 2024 च्या लोकसभेमध्ये 45 जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडून येतील, अशा पद्धतीचा प्रण घेऊन सगळेजण कामाला लागणार आहोत. त्याचबरोबर विधानसभेत 200 हून अधिक जागा भाजप जिंकल्या शिवाय राहणार नाही, आदेश विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.





चित्रा वाघ यांनी केले महिलांशी हितगुज; तब्बल अडीच तास चालली बैठक 



 

चित्रा वाघ यांनी शासकीय विश्रामगृह येथे विविध क्षेत्रात  कार्यरत मान्यवर महिलांशी संवाद साधून अकोला जिल्ह्यात महीला व बालकांसंदर्भातील विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी राजकारण बाजूला सारून चित्रा वाघ आणि उपस्थित महिला व सामजिक संस्थांचे अध्यक्ष यांच्यात मन मोकळा संवाद रंगला. ही बैठक तब्बल अडीच तास चालली, हे येथे उलेखनिय आहे. 


बैठकीत सामजिक, शैक्षणिक समस्या आणि कौटुंबिक हिंसाचार आदी विषयांवर यावर उहापोह करण्यात आला. अकोला आणि परिसरातील वंचित उपेक्षित घटकातील महिलांसह सामान्य गृहिणी, उद्योजिका सरकारी कर्मचारी महिला यांना दैनंदिन जीवनात करावा लागणारा संघर्ष यावर उपस्थित सर्वांनी विविध मुद्दे मांडून त्यावर येत्या काळात कशी मात करता येईल, याबाबात मत व्यक्त केली. खुल्या विचारांनी आणि विषयाची बंधन नसल्याने सर्व मान्यवरांनी आपली मते बिनधास्त मांडली.

   

यानंतर चित्रा वाघ यांनी आमंत्रित सर्व मान्यवरांचे आभार मानले. विविध क्षेत्रातील समस्या जाणून घेवून येत्या काळात सोडवू, अशी ग्वाही दिली. महिला या सहनशील तर आहेतच परंतु त्यांनी न  डगमगता प्रत्येक अडचणींना धैर्य ने तोंड द्यावे ,असे त्यांनी यावेळी सांगितले. त्या म्हणाल्या की काम करत असताना कोणालाही हो म्हणायला अक्कल लागत नाही, परंतु नाही म्हणायला धाडस लागते . करिता आपण ज्या क्षेत्रात जाऊ त्या क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त करावे. आणि महिलांनी आपले जीवन उज्वल करावे. येणाऱ्या प्रत्येक समस्याकडे दुर्लक्ष करा  व आपले कार्य करीत रहा,असे त्यांनी सांगितले. 




या चर्चेमध्ये महानगरातील सामजिक, राजकिय, शैक्षणिक, उद्योग, विधी, प्रसार माध्यम क्षेत्रातील मान्यवर महिला सहभागी झाल्या होत्या. यात प्रामुख्याने पल्लवी कुलकर्णी- शास्त्री, उज्वला देशमुख,अनिता सोनवणे, तेजस्विनी रणपिसे,, लीना सोनवणे, गीता सोनवणे, सोनल ठक्कर ,आरती लढ्ढा, लता गावंडे, मालती रणपिसे, पुष्पा वानखडे, मनीषा भुसारी, अपूर्वा डांगे ,सारिका देशमुख, दिपाली देशपांडे, अनघा दीक्षित, शरयू देऊळगावकर ,अपर्णा धोत्रे, स्वाती झुंझुनवाला, अश्विनी जकाते ,अंजली कोहाडकर, रजनी पालकर, ॲड. नीलिमा शिंगणे - जगड, प्रा. वंदना शिंगणे, करुणा भांडारकर, नीलम तिवारी तसेच संजय कमल अशोक यांनी सहभागी होवून उपेक्षित व वंचित घटकातील महीला व बालकांच्या समस्या मांडून उपाय सुचविले.  



झिंगु बाई बोलके यांनी साधला संवाद


समाजसेविका झिंगु ताई बोलके यांनी यावेळी चित्रा वाघ यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. तसेच त्यांनी चित्रा वाघ यांच्या करिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पाठविली. झिंगुबाई बोलके यांचे सुपुत्र आणि स्नुषा यांनी ही प्रतिमा देवून चित्रा वाघ यांचा सत्कार केला.





 

महिला मेळावा: महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही 



महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही त्यांना पाठीशी घालणाऱ्या विरुद्ध शिंदे फडणवीस सरकार कारवाई करणार व मातृशक्तीच्या पाठीशी भाजपा महिला आघाडी खंबीरपणे उभी असल्याची सांगून महिला पदाधिकाऱ्यांनी मातृ शक्तींच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवा, असे आवाहन भाजपा प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.



अकोला ग्रामीण व महानगर महिला आघाडी तर्फे मंगळवारी आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.   


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुसुम भगत होत्या.  प्रदेश भाजपा सरचिटणीस व जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, मंजुषा सावरकर, अर्चना मसने, अर्चना शर्मा, चंदा शर्मा,  रश्मी कायंदे, चंदा ठाकूर, पुष्पा खंडेलवाल, रश्मी जाधव, किशोर पाटील, माधव मानकर, रमेश खोबरे, संजय जीरापुरे, संजय गोडा, केशव ताथोड, संजय गोटफोडे, संगीता जाधव, जयश्री फुंडकर, योगिता पावसाळे, मोनीका गावंडे, गीतांजली शेगोकार, वैशाली शेळके, साधना ठाकरे, साधना येवले, शकुंतला जाधव, वैशाली निकम, पुष्पा रत्नपारखी, वैशाली देवकते, संगीता नानोटी, लता साबळे, संगीता सुरंगे आदी विराजमान होते.



समाजाला दिशादर्शकाचे कार्य मातृशक्ती करत असते त्यामुळे प्राचीन संस्कृतीमध्ये वापरू शकतील महत्त्वपूर्ण स्थान असून समाज व राष्ट्र निर्माण व परिवाराच्या विकासात विकासात परिवाराच्या विकासात मातृ शक्तीचे महत्त्वपूर्ण योगदान असते. त्यामुळे संस्कृतीमध्ये मातृशक्ती पूजनी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेत मातृ शक्तींची महत्त्वपूर्ण योगदान असून, देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्य देशाच्या प्रगतीमध्ये वाचू शकतील . प्रतीक्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असल्यामुळे भारतीय जनता पक्ष  शक्तींचा सन्मान करीत असून संघटनेचा विस्तार करण्यात व 51 टक्के पेक्षा जास्त मतं मिळवण्यात मातृ शक्तीचा महत्त्वपूर्ण योगदान असल्यास प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी याप्रसंगी केले.



समाजातील पीडित वंचित महिलांच्या पाठीशी मातृ शक्तीने खंबीरपणे उभे राहावे. अन्याय अत्याचाराच्या विरोधात सदैव आपल्या पदाचा वापर करून समाजात योग्य स्थान प्राप्त करून देण्यासाठी मातृशक्तीने कार्यरत व्हावे. तसेच पक्ष संघटनेचा विस्तार करून आपल्या सामाजिक कामाने समाजातील सर्व घटकांना भाजपाशी जोडण्याचे काम करावे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात  सगळे राजकीय पक्ष असून मातृ शक्तीकडे महत्त्वाची जबाबदारी असो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमातून अपप्रचारच्या जबाब देण्यासाठी घरघर संपर्क साधून, राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान द्या, असे आवाहन सुद्धा यावेळी चित्रा वाघ यांनी केले. यावेळी त्यांनी अनेक प्रसंग अनेक घटनेचा वर्णन सांगून आपण 24 तास महिलांच्या प्रश्नासाठी उपलब्ध असल्याची याप्रसंगी सांगितले.



विजय अग्रवाल यांनी सुद्धा समोरचीत भाषणे झाली. रश्मी जाधव यांनी सुद्धा आपल्या भाषणातून मार्गदर्शनक केले. संचलन रश्मी कायंदे, कुसुम भगत यांनी तर प्रास्ताविक आभार  चंदा शर्मा यांनी मानले.

टिप्पण्या