akola court: धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला एक वर्षाचा कारावास




भारतीय अलंकार 24

अकोला :  जिल्हा न्यायालयातील सातवे सह दिवाणी न्यायाधीश यांच्या न्यायलयाने गुरुवारी अनुप गुलाबराव आगरकर याला धनादेश अनादर प्रकरणी एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली . सोबतच फिर्यादी हेमंत मिश्रा यांना एक लाख रुपये रक्कम द्यावी आणि या रक्कमेवर दर साल दर शेकडा नऊ टक्के व्याजदराने परतफेड करावी, व्याज न दिल्यास आणखी तिन महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. 



सन २०१३ मध्ये आरोपी अनुप गुलाबराव आगरकर याने फिर्यादी हेमंत मिश्रा कडून एक लक्ष रुपये हातउसने घेतले होते. रक्कमेच्या परतफेड करण्यासाठी आरोपी आगरकरने हेमंत मिश्रा याला धनादेश सुद्धा दिले. हेमंत मिश्राने धनादेश खात्यात लावले असता ते अनादर झाले. या प्रकरणी फिर्यादी हेमंत मिश्रा याने २०१३ ला न्यायालयात खटला दाखल केला.  खटल्याचा निकाल गुरुवारी जिल्हा न्यायालयातील सातवे सहदिवाणी न्यायाधीश  पैठकर  यांचे न्यायालयाने लावला. 



या प्रकरणी आरोपी अनुप गुलाबराव आगरकर (रा. सुधीर कॉलनी) याला एक वर्षाचा साधा कारावास व एक लक्ष रुपये हे फिर्यादीला देणे तसेच  प्रकरण २०१३ मध्ये दाखल झाल्यापासून दर साल दर शेकडा नऊ टक्के दराने धनादेश रक्कम अदा होईपर्यंत व्याज देणे व सदर व्याज न दिल्यास तीन महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सदर प्रकरणांमध्ये फिर्यादीतर्फे अधिवक्ता गणेश परियाल यांनी काम पाहिले.



…….



अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस सश्रम कारावास 


भारतीय अलंकार 24

अकोला: अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस न्यायलयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

१० नोव्हेंबर रोजी  अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. गोगरकर यांनी ६१ वर्षीय आरोपी हरिदास सहदेव डोंगरे ( रा. इंदिरा नगर, वाडेगांव, ता. बाळापूर, जि. अकोला,) याला भा.दं.वि. कलम ३५४-अ व कलम ७, ८, १२ व कलम ४२ नुसार पोक्सो कायदया अंतर्गत दोषी ठरवुन शिक्षा सुनावली आहे.


घटनेची हकीकत अशी की, पिडीता ही तिच्या घरामध्ये असतांना सायंकाळी पाउस येत होता तेव्हा आरोपी हा पिडीतेच्या घरामध्ये आला व त्याने तिला बसण्यासाठी खुर्ची मागितली व तेवढयात आरोपीने तिचा विनयभंग केला व पिडीतेने विरोध केला असता आरोपीने तिचे तोंड दाबुन डोळे वासुन निघुन गेला. त्यानंतर सायंकाळी पिडीतेने तिचे आई घरी आल्यावर झालेली हकीकत आई, वडिल व आजी यांना सांगितली व म्हणून पिडीतेने आरोपी विरुध्द दि. २२.०७.२०२० रोजी पो.स्टे. बाळापूर फिर्याद दिली व म्हणून आरेपी विरुध्द कलम ४५२, ३५४ - अ भा.द.वि व बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायदयाचे कलम ७, ८, १२ व ४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व सदरहु गुन्हयाचा तपास पूर्ण झाल्यावर आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.


सदरहू प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरीता एकुण ०४ साक्षीदार तपासले. तसेच आरोपीने सुध्दा बचावासाठी साक्षीदार तपासले. परंतु सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय मानुन  न्यायालयाने आरोपी हरिदास सहदेव डोंगरे याला भा.द.वि. कलम ३५४ व बाल लैंगिक अत्याचार कायदयाचे कलम ७, ८, १२ ४२ अंतर्गत दोषी ठरवुन ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रु. ५०००/- दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली.


या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील शाम खोटरे व  शितल भुतडा यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली. तसेच कोर्ट पैरवी एल.पी.सी. रेखा पाटील व एल.पी.सी. सोनु आडे यांनी सहकार्य केले.


.........


विनयभंग प्रकरणी आरोपीला ३ वर्षांची शिक्षा

  

भारतीय अलंकार 24

अकोला: आरोपी स्वप्नील वासुदेव बुधे याने आपल्या मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार अल्पवयीन मुलीच्या पालकांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिली होती.  या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 354 आणि पॉस्को अन्वये गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.  फिर्यादीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला कलम 354D अन्वये दोषी ठरवून तीन वर्षांची सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले.  दंड न भरल्यास आरोपीला एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.  तोच आरोपी पॉस्को कलमान्वये दोषी मानून त्याला ३ वर्षे सश्रम कारावास आणि १००० हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले.  दंड न भरल्यास आरोपीला आणखी एक महिना कारावास भोगावा लागणार आहे.  सरकारी पक्षातर्फे अधिवक्ता किरण खोत यांनी काम पाहिले.


टिप्पण्या