akola - akot broad gauge route rail: अकोला - अकोट ब्रॉडगेज मार्ग 11 नोव्हेंबरला सुरु करण्याची रेल्वेने 'सुवर्ण'संधी गमावली!



ठळक मुद्दे


अकोला - पूर्णा ब्रॉडगेज मार्गाला १४ वर्षे पूर्ण




१४ वर्षाचा वनवास, मार्ग अद्याप उपेक्षितच



ॲड. अमोल इंगळे 

अकोला: मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणारे अकोला रेल्वे स्थानकाचे नाव भारतात उत्पन्न देणाऱ्या पहिल्या 100 स्थानकांमध्ये आहे.  अकोला स्थानकाहुन दक्षिण मध्य रेल्वेचा हैद्राबाद -  अजमेर मार्ग सुद्धा जोडला आहे.  भारतातील रेल्वे मार्गांचा विकास करण्या अंतर्गत अकोला - पूर्णा मीटरगेजचे रूपांतर ब्रॉडगेज मध्ये करण्यात आले. 


14 वर्षांपूर्वी 11 नोव्हेंबर 2008 ला ब्रॉडगेज सुरु करून पहिली पूर्णा - अकोला पॅसेंजर या मार्गावर धावली. लोकप्रतिनीधी व प्रवाश्यांची उत्साहाने या पॅसेंजरचे स्वागत केले होते.  ब्रॉडगेज झाल्यानंतर या मार्गाचा विकास होईल अशी प्रवाश्यांची अपेक्षा होती. मात्र हा मार्ग 'जाणीवपुर्वक ?' दुर्लक्षित राहिला.  

प्रवाश्यांचा प्रतिसाद, रेल्वे प्रवासी संघटनच्या मागण्या असतांना सुद्धा या मार्गावर अपेक्षित विकास झाला नाही.  



लोकप्रतिनिधींची उदासीनता -

केंद्रात तसेच राज्यातील सरकारमध्ये मंत्रीपद मिळाल्यानंतर सुद्धा लोकप्रतिनिधींकडून मार्गाचा विकास केला नाही. रेल्वे प्रवासी संघटनांनी लोकप्रतिनिधींकडे मागणी करून सुद्धा याबाबत कुठलेही प्रयत्न करण्यात आले नाही. गेल्या चौदा वर्षात या मार्गावर लोकप्रतिनिधींकडून अकोला वरून सुरुवात होणारी एकही नियमीत धावणारी लांबपल्याची नवीन ट्रेन सुरू करण्यात आली नाही. 



अकोला - अकोट ब्रॉडगेज मार्ग सुरु करणे*

गांधीग्राम येथील पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अकोला - अकोट ब्रॉडगेज मार्ग तपासणी करून तयार आहे. लोकप्रतिनिधींची व रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे अकोला - अकोट ब्रॉडगेज मार्ग 11 नोव्हेंबरला सुरु करण्याची रेल्वेने 'सुवर्ण'संधी गमावली. 



चौदा वर्षातील प्रगती -

- अकोला - पुर्णा मार्गाचे विद्युतीकरण प्रगतिप्रथावर 


-  1 हमसफर, 7 सुपरफास्ट, 9 एक्सप्रेस, 1 पॅसेंजर सुरु (14 वर्षात केवळ 18 रेल्वे, शेवटची सुरू केलेली हमसफर  रेल्वे 05 ऑक्टोबर 2018. दैनंदिन रेल्वे फक्त 4)



*प्रलंबित मागण्या -*


-  पॅसेंजरची संख्या वाढविण्यात आलेले नाही.


- अकोला स्थानकांवर पिट लाईन बनवण्याची मागणी. 


- नांदेड स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे अकोला स्थानकावरून सुरु करण्याची मागणी. 


-  साप्ताहिक सुरू असलेल्या रेल्वे यांना नियमित करणे तसेच स्पेशल च्या नावावर सुरू असलेल्या रेल्वे नियमित करण्यात आल्या नाही.


- अकोला - अकोट मार्ग सुरू केला नाही.


- दक्षिण - मध्य रेल्वे मार्ग मध्य रेल्वेला जोडण्यात आलेला नाही.


- उत्तर - पूर्व भारत करिता थेट गाडी अद्याप मिळाली नाही.


- अमरावती - पुणे एक्सप्रेस, अजनी - एलटीटी मुंबई एक्सप्रेस पुन्हा सुरु करणे 


- हैद्राबाद - नागपूर -  इटारसी व मिरज - पुणे  - भुसावळ मार्ग साप्ताहिक धावणाऱ्या रेल्वे  हैद्राबाद - अकोला -  खांडवा मार्ग सुरु कराव्यात. 






टिप्पण्या