- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला : एका लग्नाची गोष्ट सध्या अकोल्यात चर्चेत आहे. व्यवसायाने वैद्यकीय प्रतिनिधि असलेले दीपक मायी यांची कन्या डॉ. ऋतुजा चा मुंबई येथील डॉ. मृणाल सोबत विवाह पार पडला. विवाह प्रित्यर्थ लग्नात आलेल्या पाहुण्यांनी दिलेली रोख स्वरुपातील भेट त्यांनी न स्वीकारता रुग्णांच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या अकोल्यातील डॉ. हेडगेवार रक्तपेढी या सेवाभावी संस्थेला देणगी दिली.
लग्न सोहळ्यात दीपक मायी यांनी याकरिता एक फलक लावून भेट राशी करिता एक हंडी सजवून ठेवली होती. ज्यावर त्यांनी त्यांचा संकल्प लिहला होता. "आपण संकल्पात आम्हाला साथ द्यावी व या संकल्प कलशात आपली भेट राशी टाकावी व आपले अमुल्य शुभाशिर्वाद वधु-वरांना द्यावे ही विनंती.." असे लिहण्यात आले होते. हा आकर्षक कलश सर्व पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होते. लग्न सोहळा पार पडल्यानंतर हंडीचे झाकण उघडून, रक्कम मोजण्यात आली. भेटवस्तूच्या स्वरूपात 1 लाख 55 हजार राशी या हंडीत जमा झाली होती.
कुठल्याही प्रकारची भेटवस्तू न स्वीकारता सामाजिक कार्यात ही राशी देऊन दीपक मायी यांनी समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मायी कुटुंबाच्या या सत्कार्याचे अकोला शहरात कौतुक होत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा