Nashik Aurangabad road accident; नासिक औरंगाबाद रस्त्यावर पहाटे भीषण अपघात; 11 जणांचा होरपळून मृत्यू, मृतकाच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर

    photo:social media 



नासिक: औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात जवळ लक्झरी बस आणि टेम्पो मध्ये शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास भीषण अपघातात झाला असून, यामध्ये अकरा प्रवश्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये एका बालकाचा समावेश असल्याचे कळते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले असून, मृत्कांच्या नातेवाईकांनी पाच लाखाची मदत जाहीर केली आहे. लक्झरी बस पुसद यवतमाळ येथील चिंतामणी ट्रॅव्हलसची असल्याचे कळते.

यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना  अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळी अग्निशमन दलाची तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या होत्या.

साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले त्यांनी उड्या मारल्या तर आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीमुळे जळून खाक झाले. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.. अपघातानंतर बस 60 ते 70 फूट पुढे घसरत गेली तर टेम्पो 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला. टेम्पो बसला धडकल्याने बसच्या पेट्रोल डिझेल टाकीने पेट घेतला असल्याचे कारण समोर येत आहे.


अपघातात जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या बसमधून हलविण्यात आले. या घटनेत 10 लोक जळून खाक झाले तर 34 जणांवर उपचार सुरू आहेत. मृतकांची आणि जखमीची नावे वृत्त लीहस्तोवर प्राप्त झाली नाहीत.  अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकीत धाव घेतली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनस्थळी पोहचले.




Update


नाशिक नांदूरनाका अपघातावर मुख्यमंत्र्यांकडून तीव्र दुःख व्यक्त


मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार


मुंबई, दि. ८:  नाशिक- नांदूरनाका येथे झालेल्या खाजगी बसच्या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करून या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.  


अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

अपघाताच्या कारणांचा सर्वंकष चौकशीतून शोध घेतला जाईल. त्याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळावरील  मदतीसाठी तसेच रूग्णालयातील उपचारासाठी सर्व यंत्रणा तातडीने कार्यान्वित व्हाव्यात यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. 




टिप्पण्या