diwali 2022: अन् खऱ्या लक्ष्मीची पुजा करुन त्यांनी केली दिवाळी साजरी…





ॲड. नीलिमा शिंगणे - जगड 

अकोला: स्थानिक जी.प नगर खडकी बु. अकोला येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा निर्भय बनो जन आंदोलनाचे संयोजक, जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती अकोला यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिवाळीच्या दिवशी आपल्या घरातील खऱ्या लक्ष्मी असलेल्या पत्नी यूगेश्वरी हरणे व मुलगी अवंती हरणे यांचे दिवाळीच्या दिवशी  आपल्या पत्नी व मुलीचे पूजन करून दर्शन घेतले. घरामधील असलेल्या आपल्या महिलांना खऱ्या अर्थाने मानसन्मान देऊन त्यांचे पूजन करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे काम गेला अनेक वर्षापासून समाजसुधारक स्वतः करीत आहे. 





दुसरा सांगे ब्रह्मज्ञान न करता स्वतः प्रत्येक गोष्ट कृतीत उतरून ते काम स्वतःपासून सुरुवात करीत असतात .असे हे कृतिशील सामाजिक कार्यकर्ता म्हणून अकोला जिल्ह्यामध्ये सुपरीचीत  असलेले गजानन हरणे हे दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरातील महिलांचा मानसन्मान करून त्यांचे औक्षवंत करून त्यांचे दर्शन घेऊन खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करीत असतात. आणि हीच परंपरा कायम ठेवून त्यांनी या वर्षी सुद्धा दिवाळीच्या दिवशी आपल्या पत्नी व मुलीचे औक्षवंत करून दर्शन घेऊन गोळ पदार्थ खाऊ घालून दिवाळी साजरी केली. 


कारण घरातील लक्ष्मी जर समाधानी,सुखी आनंदी असेल तरच खऱ्या अर्थाने घराला घरपन राहत असते. नुसतं मातीच्या मूर्तीची पूजा करून घरात शांतता ,आनंद राहू शकत नाही. म्हणून आपल्या घरातील पत्नी ,मुलगी ,बहीण , आई  जे कोणी हजर असतील त्या सर्वांचा आदर राखून प्रेमपूर्वक व आनंदाने पूजन करावे मी दरवर्षी करतो आपण सुद्धा पुढच्या वर्षीपासून आपल्या घरातील महिलांना मान सन्मान देऊन त्यांचे पूजन करण्याचे आवाहन समाजसुधारक गजानन हरणे यांनी यावर्षीच्या दिवाळीनिमित्त जागरूक ,परिवर्तनवादी नागरिकांना  केले आहे. तरच खऱ्या अर्थाने आपण दिवाळी साजरी केल्याचे समाधान आपल्याला मिळेल. त्यांच्या या कृतीचे अनेक सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांकडून कौतुक होत आहे. त्यांच्या या सुधारणावादी कार्याबाबद  आनंद व्यक्त केला जात आहे.



टिप्पण्या