- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
diwali 2022: dhanwantaari award: फडणवीसांच्या शुभहस्ते वैद्य दत्तात्रय सराफ यांना धन्वंतरी पुरस्कार प्रदान;डॉ क्षितिज गुल्हाने यांना युवा आरोग्यरत्न पुरस्कार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भाजपा वैद्यकीय आघाडी नागपूर महानगरचे आयोजन
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: भाजप वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगर द्वारे धन्वंतरी जयंतीचे मंगल औचित्य साधून नागपुरातील सुप्रसिद्ध आयुर्वेद पंचकर्मतज्ञ वैद्य दत्तात्रय सराफ यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते वैद्यकीय क्षेत्रातील सेवाकार्याबद्दल धन्वंतरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्कारात सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि शाल श्रीफळ असं पुरस्काराचे स्वरूप असून तसेच वैद्यकीय आघाडी द्वारे यावर्षीचे युवा आरोग्यरत्न पुरस्कार क्रमश: नागपुरातील युवा न्युरोसर्जन डॉ क्षितिज गुल्हाने, नर्सिंग ऑफिसर डॉ अंकुश खोरगडे यांना प्रदान करण्यात आले. सर्वप्रथम भगवान धन्वंतरीच्या प्रतिमेला माल्यर्पण करून देवेंद्र सत्कारमूर्ती डॉक्टर्सचे अभिनंदन केले व पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या. डॉ.क्षितिज हे अकोल्यातील रहिवासी असून, ॲड. जे एम. गुल्हाने व ॲड. अरुणा गुल्हाने यांचे चिरंजीव आहेत.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन भाजपा शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांचे असून भाजपा वैद्यकीय आघाडी शहर अध्यक्ष डॉ गिरीश चरडे, महामंत्री डॉ श्रीरंग वराडपांडे, डॉ अजय सारंगपुरे, डॉ तुषार पांडेल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा