भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेले सेवानंद महादेव तायडे यांच्यावर एका मुलीने गंभीर आरोप केले होते. १ जुलै २०२६ रोजी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ३० जून २०२६ रोजी आरोपीने मद्यधुंद अवस्थेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप होता. याआधीही अशा प्रकारे दोनदा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर पीडित मुलीने आपल्या आईला याची माहिती दिली आणि पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी १ जुलै २०२६ रोजी आरोपीला अटक केली होती, तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता.
अकोला येथील विशेष (पोक्सो) न्यायालयाने आरोपीला मोठा दिलासा दिला आहे. विनयभंगाचा आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीचा जामीन अर्ज न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांनी 28 जुलै 2026 रोजी मंजूर करून आरोपीला जामीनवर सोडला आहे. आरोपीतर्फे ॲड. चंद्रकांत एन. वानखडे यांनी बाजू मांडली आणि ॲड. कांचन शिंदे, ॲड. असद खान, ॲड. सुमेध डोंगरदिवे, ॲड. एम. ए. परवेज अरमानी, ॲड. प्रवीण पोहरे, ॲड. अनवर शेरा, ॲड. कांचन ननिर, ॲड. सुनीता गवई, आणि ॲड. केशनी खंडेराव यांनी सहकार्य केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा