- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Crack river bridge in Gandhigram: गांधीग्राम मधील ब्रिटिशकालीन नदी पुलाला तडा; कठडे जमीनदोस्त, अकोट अकोला वाहतूक प्रभावित, पर्यायी मार्गाने वाहतूक वळती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: तीन दिवसापासून अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे काटेपूर्णा धरणाचे दरवाजे पाणी विसर्गासाठी उघडण्यात आले आहे. याचा प्रभाव जनजीवनावर पडला असून असून,आज सकाळी अकोट अकोला मार्गांवरील गांधी ग्राम येथील पूर्णा नदीवरील पुलाचा काही भाग क्षतीग्रस्त असून तडा गेली आहे. नदी पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. दक्षता म्हणून पोलीस विभागाने अकोला अकोट या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाकडे वळविले आहे.
पूर्णा नदी अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथून वाहते. या नदीवरील पूल धोकादायक ठरत आहे. अनेकदा नागरिकांनी याबाबात प्रशासनाला अवगत केले आहे मात्र प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नेमेचि येतो पावसाळा असे म्हणून प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत.
दरवर्षी पुराच्या पाण्याखाली असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पूल क्षतीग्रस्त झाला आहे. या पुलावर असलेले लोखंडी कठडे पाण्याच्या प्रवाहाने वाहुन गेले आहेत. तसेच पुलाच्या बाजूला असलेले दोन्ही भागाकडील लोखंडी संरक्षण कठडे तुटुन जमीनदोस्त झाले आहेत. या पुलावरून जीव मुठीत घेऊन नागरिक प्रवास करत असतात.
मंगळवारी सकाळी या पुलाचा काही भाग क्षतीग्रस्त झाला. पुलला तडा गेल्याचेही नागरिकांनी सांगितले. नदी जल पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. दक्षता म्हणून पोलीस विभागाने अकोला अकोट या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाकडे वळविले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा