court news: सरकारी कामात अडथळा निर्माण प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता




अकोला: सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी सबळ पुरावा अभावी आरोपींची न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली आहे.


14 जुन 2016 रोजी फिर्यादी संजय सुदाम जूमळे (बस चालक) यांनी डाबकी रोड पोलीस स्टेशन अकोला येथे तक्रार नोंदविली होती.

तक्रारीनुसार,14 जुन 2016 रोजी जुमळे तेल्हारा बस स्टँडवरून गाडी क्रमांक एम एच 40 एन 9716 क्रमांकाची तेल्हारा ते अकोला बस घेवून निघाले. डाबकी गावाच्या आधी टँकरचे चालकने ओव्हरटेक करण्याचा इशारा केला होता. व पुढे रेल्वे गेट बंद होते. तेंव्हा टँकरचा चालक व क्लिनर आले आणि ओव्हरटेकच्या कारणावरून जुमळे यांच्याशी वाद केला. लोखंडी टमी व लाथा बुक्यानी मारहाण केली. या वादात बस चालक संजय जुमळे व बस वाहक अमोल अरबट जखमी झाले होते.


या प्रकरणात डाबकी रोड पोलीस स्टेशन तपास अधिकारी एस पी खंडारे यांनी आरोपी गुलाम अब्दुल्ला व अब्दुल हयात यांचे विरूद्ध भांदवि कलम 353,332,504,34 गुन्हे दाखल केले.या प्रकरणात एकूण पाच साक्षदारांचे बयान नोंदविण्यात आले होते.


प्रकरण दुसरे जिल्हा व सत्र न्यायधीश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयात चालले.न्यायलयाने सबळ पुरावा अभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ॲड. अलीराजा खान ॲड. अय्युब नौरंगाबादे यांनी काम पाहिले.

टिप्पण्या