court news: जबरी चोरीच्या आरोपातून विनोद पुसाम निर्दोष मुक्त



अकोला: खदान पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातून आरोपी विनोद पुसाम याची 4 थे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अकोला न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.



याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, सन २०१२ मध्ये आरोपी विनोद पुसाम याने शिवापूर फाटा अकोला येथे फिर्यादी हिच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून हिसकावून डोरले घेऊन पळण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीवर भा. दं. वि. कलम ३९२ नुसार जबरी चोरीचा गुन्हा खदान पोलिस स्टेशन येथे दाखल झाला होता.



या प्रकरणामध्ये अभियोग पक्षाने आरोपी विरूद्ध दोषारोप सिद्ध करण्यासाठी एकूण सात साक्षीदार तपासले. सर्व साक्षीदारांचे वेगवेगळे बयानाच्या आधारावर न्यायालयाने संशयाचा फायदा देऊन या प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता केली. आरोपीकडून विधिज्ञ सुमेध डोंगरदिवे यांनी कामकाज पाहिले.

टिप्पण्या