- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
crime-news-cbi-fraud-akola-: तोतया CBI अधिकाऱ्यांचा पर्दाफाश : २५ लाखांची रक्कम अवघ्या १२ तासांत जप्त, खामगाव येथून दोन आरोपी जेरबंद
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
ठळक मुद्दे
*तोतया CBI अधिकारी बनून व्यापाऱ्याची लूट
*२५ लाखांची रोख रक्कम हिसकावली होती
*CCTV व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध
*अवघ्या १२ तासांत दोन्ही आरोपी अटकेत
*एकूण २७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
*उत्कृष्ट कामगिरीबद्दल पथकाला २५ हजारांचे बक्षीस
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत तत्परता आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून मोठी कारवाई करत तोतया CBI अधिकाऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या २५ लाख रुपयांच्या लूटप्रकरणात अवघ्या १२ तासांत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील संपूर्ण रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
दिनांक १९ जून २०२६ रोजी बाळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. खामगाव येथील व्यापाऱ्याला CBI अधिकारी असल्याचा बनाव करून आरोपींनी धमकी देत त्याच्याकडून तब्बल २५ लाखांची रोख रक्कम हिसकावून नेली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
तपासादरम्यान खामगाव ते बाळापूर मार्गावरील जवळपास १०० CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासण्यात आले. तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये:
• हार्दिक मनोज कुमार गुरबानी (वय २२ वर्षे, खामगाव)
• साहिल नंदकिशोर नथाणी (वय २५ वर्षे, खामगाव)
यांचा समावेश आहे.
आरोपींकडून गुन्ह्यातील २५ लाख रुपयांची रोख रक्कम, फिर्यादीचा मोबाईल तसेच दोन दुचाकी वाहने आणि मोबाईल असा एकूण २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दाखवलेली तत्परता, तांत्रिक तपास आणि सलग केलेल्या मेहनतीमुळे गंभीर स्वरूपाचा गुन्हा कमी वेळात उघडकीस आला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पथकासाठी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
Akola Police
Balapur
Breaking news
CBI Fraud
Crime News
Khamgaon
LCB Akola
Maharashtra News Crime Update
Police Action
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा