akola crime: अखेर विवरा गावातील भोंदु तांत्रिक बाबा विरूध्द गुन्हा दाखल; 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी, मृत युवकाला जिवंत केल्याचा बनाव!






भारतीय अलंकार 24

अकोला: अंत्यविधी करिता स्मशानाकडे तिर्डीवरून मृतदेह नेत असताना मृतक जिवंत झाला. ही वार्ता लगेच जिल्हाभर पसरली. मात्र  गावकऱ्यांना संशय आल्याने प्रकरणाच्या मागचे रहस्य उलगडले. युवकाला जिवंत करण्याचा बनाव करणारा भोंदू तांत्रिक बाबाला आता पोलीसांनी गजाआड केले आहे. अकोला जिल्हयातील पातूर तालुक्यातील विवरा गावातील ही घटना आहे.


पोलीस स्टेशन चान्नीचे ठाणेदार योगेश वाघमारे हे 26 ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन चान्नी येथे हजर असतांना त्यांना गोपनिय बातमीदारा कडुन बातमी मिळाली की, ग्राम विवरा येथे प्रशांत रामकृष्ण मेसरे, हा युवक मरण पावला आहे व त्याचे प्रेत अत्यंविधी करीता त्याचे नातेवाईक तिरडीवर घेवुन जात असतांना गावतील वेशी जवळ गावातील तांत्रिक बाबा दिपक उर्फ सागर गणेश बोरले याने प्रशांत रामकृष्ण मेसरे याचा भाऊ गोपाल रामकृष्ण मेसरे यास म्हणाला की, प्रशांत मेसरेला माझे कडे घेवुन चला मी त्याला जिवंत करतो. तेव्हा प्रशांत मेसरे याचे नातेवाईक त्याला घेवुन परिया माता मंदीराकडे गेले व प्रशांत याला जिवंत करण्याची प्रकीया सुरु आहे अशी माहीती प्राप्त झाल्याने ठाणेदार योगेश वाघमारे पोउपनि गणेश महाजन हे त्याचे स्टाफ सह ग्राम विवरा येथे गेले असता गावात लोकांची खुप गर्दी जमा झाली होती.  लोकवर्चा सुरू होती की, प्रशांत मेसरे यास तांत्रिक दिपक उर्फ सागर गणेश बोरले याने काहीतरी तांत्रिक विधी करून जिवंत केले आहे. अशी चर्चा सुरू होती. ठाणेदार योगेश वाघमारे यांना हे सर्व प्रकरण संशयास्पद वाटल्याने त्यांनी घटनास्थळी जावुन पाहीले असता ल्या ठीकाणी त्रिशुल, मोरपिस, कापुरडबी, पुजेचे सामान, आरतीचे ताट, हळदी कुंकु, पंचपाळे, आणि कवळयाची माळ देविची ओटी भरण्याचे साहीत्य दिसुन आले. यावरून ठाणेदार योगेश वाघमारे यांनी सत्यता पडताळणी करीता प्रशांत मेसरे याची वैद्यकीय अधिकारी प्राथमीक आरोग्य केंद्र चतारी येथे वैद्यकीय तपासणी केली असता वैद्यकीय अधिकारी यांनी प्रशांत मेसरे हयाची प्रकृती चांगली असुन तो ठणठणीत आहे. असे सांगितल्याने तांत्रिक दिपक उर्फ सागर गणेश बोरले याने लोकांचे श्रध्देचा गैरफायदा घेवुन प्रशांत मेसरे हयास तो मरण पावला नसतांना तो मरण पावला आहे असे गावातील लोकांना व त्याचे नातेवाईकांना भासवुन दिपक उर्फ सागर गणेश बोरले याने तांत्रिक क्रियेने प्रशांत मेसरे यास जिवंत केले अशी कृती करून लोकांना फसविले. समाजामध्ये अंधश्रध्दा वाढविल्याचे काम केल्याचे सत्यता पडताळणी वरून निष्पन्न झाल्याने तांत्रिक दिपक उर्फ सागर गणेश बोरले याचे हे कृत्य कलम 505, भादवि सहकलम 3, महाराष्ट्र नरबळी आणि ईतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादु टोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटण करण्या बाबत अधिनियम 2013 प्रमाणे पोउपनि गणेश महाजन यांनी फिर्याद सरकार तर्फे फिर्याद देवुन गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सुरू आहे. तसेच जनतेने कोणत्याही अफवांना व अंधश्रध्देला बळी पडु नये, असे आवाहन अकोला जिल्हयाचे पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी अकोला जिल्हयातील नागरीकांना केले आहे.



ही कार्यवाही पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक  मोनिका राउत, उपविभागिय पोलीस अधिकारी बाळापुर  गोकुल राज, यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. योगेश वाघमारे, पोउपनि गणेश महाजन यांनी केली आहे. दरम्यान आरोपीस शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता ३० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टिप्पण्या