- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Malaria department : हिवताप मुक्त अकोला: डासांचा प्रार्दुभाव रोखण्यास मलेरिया विभागाकडून फवारणीचे काम सुरू…
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सन 2030 पर्यन्त तर महाराष्ट्र शासनाने सन 2025 पर्यन्त राज्य हिवताप मुक्त करण्याचे उदिष्ठ ठेवले आहे. त्यानुषंगाने अकोला शहर हिवताप मुक्त करण्याच्या संकल्प करण्यात आला असून. शहराची दुरीकरणाकडे यशस्वी वाटचाल सुरु आहे.
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील चारही झोन मध्ये डासांचा प्रार्दुभाव रोखण्यास मलेरिया विभागाकडून फवारणीचे काम सुरू आहे. तसेच हिवताप मुक्त अकोला करण्यासाठी यावर्षी केवळ एकच दिवस जनजागृती करून न थांबता संपूर्ण वर्ष हिवताप जनजागृती वर्ष म्हणुन साजरा करण्यात येत आहे. तसेच यावर्षी मनपा कार्यक्षेत्रात हिवतापाचा कोठेही उद्रेक किंवा हिवतापामुळे एकही मृत्यु झालेला नाही. यावर्षी केवळ एक रुग्ण डेंग्यु या आजारामुळे दगावला असून मलेरिया विभागा अंतर्गत संपूर्ण शहरामध्ये ई.व्हेईकल स्प्रे मशीन द्वारे डासअळी नाशक फवारणी करण्यात येत असुन रुग्ण निघालेल्या परिसरात धुरळणी करण्यात येत असल्याची माहिती अकोला मनपा जीवशास्त्रज्ञ तथा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता पाठक यांनी दिली आहे.
अशी आहेत लक्षणे
हिवताप हा अनाफिलिस नावाच्या डासामुळे पसरतो. यामध्ये थंडी वाजून ताप येणे, ताप हा सततचा असु शकतो, घाम येऊन अंग गार पडते, तीव्र डोके दुखी, मळमळ व उलट्या अशी लक्षणे आढळतात. या प्रमाणे लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या शासकीय दवाखान्यात ताबडतोप उपचार घ्यावा.
मोफत उपचार
हिवताप संबंधित तपासणी तसेच समुळ उपचार सर्व नागरी आरोग्य केंद्रामध्ये तसेच मनपा रुग्णालयामध्ये मोफत उपलब्ध आहेत. मनपा नागरी आरोग्य केंद्र तसेच मनपा रुग्णालय येथे आरोग्य सेवक व आशा स्वयंसेवीका यांच्या मार्फत घरोघरी भेटी देऊन दूषित रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात येत आहेत. रक्त तपासणी मध्ये हिवतापाचे जंतू आढळून आल्यास जंतू प्रकार नुसार रुग्णावर समूळ उपचार करण्यात येतो. एडिस या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्याच्या साठ्यामध्ये होते अशी माहिती विभागप्रमुख डॉ. अस्मिता पाठक यांनी दिली आहे.
अशी घ्यावी काळजी
हिवतापाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन साचलेले पाणी वाहते करावे,
पाणी साचलेले खड्डे बुझवावेत,
पाण्याच्या भांड्यांना घट्ट झाकण बसवावे,
आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा,
घरांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावे,
साचलेल्या पाण्यात किंवा डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडावेत,
निरुपयोगी साहित्य जसे ड्रम, नारळाची करवंटी, टायर, रिकामे डबे नष्ट करावे,
कुलर मधील पाणी दर दोन दिवसांनी बदलावे, संडासाच्या व्हॅट पाईपला जाळी बसवावी,
कुंड्यांमध्ये आवश्यक तेवढेच पाणी टाकावे, घरांच्या खिडक्यांना जाळी बसवावी,
झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन मनपा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा