amravati crime - murder- kidnap: अल्पवयीन मुलीचे केले होते अपहरण; अपहरणकर्ता गुंडाला लोकांनी जागेवरच ठेचला, मारेकरी सहा तासात गजाआड




ठळक मुद्दे 

*चांदुर रेल्वे शहरात शिवाजी नगर गारोडी पुरा मधील  कुख्यात गुंड नईम याचा रात्री खून 


*अल्वीवयीन मुलीचे केले होते अपहरण. 

अल्पवयीन मुलीला घरी आणून सोडले; 

आणि त्याचं वेळी मध्यरात्री त्याचा खून करण्यात आला.


*खून प्रकरणातील आरोपीची नावे 

आशिक अब्दुल कादर, (वय ४२ वय २६ वर्षे, रा. चांदुर रेल्वे), अफजल खा युसुफ खा गदारी, (वय २७ वर्षे, रा. चांदुर रेल्वे),  साजीद उमर उर्फ पप्पु फारूख शेख, (वय ४१ वर्षे, रा. चांदुर रेल्वे), दीपक रतन पवार,( वय २८ वर्षे, रा. चांदुर रेल्वे)



भारतीय अलंकार 24

अमरावती: जिल्ह्यातील चांदुर रेल्वे शहरातील गारुडीपुऱ्यातून अपहरण केलेली अल्पवयीन मुलगी अपहरणकर्त्याने गुरुवारी रात्री परत आणून सोडली आणि काही वेळातच त्याचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह याच परिसरात आढळून आला. मुलीच्या सुटकेसाठी दोन दिवसांपासून ठाण्यावर जमावाने घेराव घातला होता. यामुळे तब्बल १२ गुन्हे दाखल असलेल्या  गुंडाला कुणी संपविले, जमावाने की यामागे गुन्हेगारी विश्वातील पूर्ववैमनस्य कारणीभूत आहे, अशी चर्चा होत असतानाच पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेवून चौकशी केली असता, खुनाची कबुली दिली. अवघ्या सहा तासात पोलीसांनी आरोपींना पकडुन गुन्ह्याची उकल केली. आज शनिवारी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.


नईम खान रहमान खान (३५, रा. एस.टी. डेपोच्या मागे) असे मृतकाचे नाव असून त्याच्या शरीरावर चाकूचे असंख्य वार असल्याचे पोलीस पंचनाम्यात पुढे आले होते. बुधवारी दुपारी त्याच्यासह शेख अशफाक, अतुल कुसराम व चांदूरवाडी येथील एक आरोपी गारुडीपुऱ्यात शिरले. नागरिकांना या चौकडीने चाकूचा धाक दाखवीत गप्प केले व मुलीला जबरीने विना क्रमांकाच्या वाहनात बसवून पलायन केले होते.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक २३.०९.२०२२ रोजी पो.स्टे. चांदुर रेल्वे येथे नईम खान रहेमान खान याची चांदुर रेल्वे येथे झालेल्या हत्येवरून पोस्टे चांदुर रेल्वे येथे अप. क. ४९९ / २२ कलम ३०२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.


गुन्हाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक व पोलिस स्टेशन, चांदुर रेल्वे येथील पथकाव्दारे तपासादरम्यान दि. २१.०९.२०२२ रोजी मृतक नईम खान रहेमान खान याने त्याचे काही साथीदारांसह गारूडी मोहल्ला, चांदुर रेल्वे येथील एका अल्पवयीन मुलीच जबरदस्तीने अपहरण केले होते. यावरून पोस्टे चांदुर रेल्वे येथे आरोपी विरूद्ध गुन्हा नोंद करण्यात येवुन पिडीता व आरोपी याचा शोध सुरू होता. दि. २३.०९.२०२२ चे सकाळी ०१.३० वा. चे दरम्यान आरोपी हा आपले साथीदारासह चांदुर रेल्वे येथे येवुन त्याने पिडीता हिस आपले घराजवळ सोडुन दिले. त्यादरम्यान या मोहल्लामध्ये हजर असलेले  मो. आशिक अब्दुल कादर, वय ४२ वय २६ वर्षे, रा. चांदुर रेल्वे , अफजल खा युसुफ खा मदारी, वय २७ वर्षे, रा. चांदुर रेल्वे , साजीद उमर उर्फ पप्पु फारूख शेख, वय ४१ वर्षे, रा. चांदुर रेल्वे, दीपक रतन पवार, वय २८ वर्षे, रा. चांदुर रेल्वे यांचे सोबत नईम खान रहेमान खान यांनी वाद करून आरोपीनी नईम खान रहेमान खान यास जिवानीशी ठार मारले, अशा मिळालेल्या माहितीवरून सर्व आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांना गुन्हा संबंधाने विचारपुस केली असता, त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केलेबाबत कबुली दिली. यानंतर आरोपीतांना पुढील कारवाई कामी पो.स्टे. चांदुर रेल्वे यांचे ताब्यात देण्यात आले.


ही कार्यवाही  पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधिक्षक  शशिकांत सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी  सूर्यकांत जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती (ग्रामीण) व पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांचे नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक तस्लिम शेख, पोलीस उपनिरीक्षक सुरज सुसतकर व त्यांचे पथकातील अंमलदार तसेच पोस्टे चांदुर रेल्वे येथील सहायक पोलीस निरीक्षक अनिल पवार, मनोज सुरवाडे, सहायक पोलिस निरीक्षक  गिता तांगडे, पोलीस उपनिरीक्षक  संजय राठोड  यांनी केली. सायबर सेलची तपासात मदत झाली.


दरम्यान,अपहरण प्रकरणात आरोपीच्या अटकेच्या व मुलीच्या सुटकेच्या मागणीसाठी लोकांनी पोलीस ठाण्यालाच घेराव घातला होता. ठाणेदार विलास कुळकर्णी यांच्या नेतृत्वात तातडीने दोन पथके आरोपींच्या अटकेसाठी रवाना करण्यात आली होती.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. तथापि, त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. दुसरीकडे २४ तास होत असतानाही मुलीचा पत्ता लागलेला नसल्याने गारुडीपुऱ्यातील नागरिकांनी पुन्हा पोलीस ठाणे गाठले व सुमारे दोन तास ठिय्या दिला. नारेबाजी केली. पोलिसांनी आश्वासन देऊन त्यांना परत पाठविले. नागरिकांचा रोष पाहता अमरावती येथून आरसीपी पथक, तसेच कुऱ्हा व तळेगाव दशासर पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री नईम खान हा अपहृत मुलीला घेऊन गारुडीपुऱ्यात आला. त्याने तेथून काढता पाय घेताच तासा दिडतासाने काही अंतरावर त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मध्यरात्री दीडच्या सुमारास आढळून आला. त्याच्या शरीरावर चाकूने भोसकल्याचे असंख्य वार होते. 

या घटनेची माहिती मिळताच ठाणेदारांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी शुक्रवारी रात्री चौघांना अटक केल्यानंतर त्यांच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज शनिवारी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.


दरम्यान,चांदूर रेल्वे शहर पोलिसांनी नईमचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंबाच्या स्वाधीन केला. शुक्रवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत जगदाळे यांनी दिवसभर घटनेचा आढावा घेतला. पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक मनोज सुरवाडे, गीता तागडे, जमादार शिवाजी घुगे, मनोज मेश्राम, दिनेश राठोड, योगेश कडू यांनी चोख बंदोबस्त ठेवून कुठलाही शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी तत्पर होते. मृत नईमवर खुनासह खुनाचा प्रयत्न, अपहरण, धाकदपट अशा प्रकारे १२ गुन्हे दाखल आहेत. संघटित गुन्हेगारीमुळे पोलीस दप्तरी कुख्यात गुंड असा त्याचा उल्लेख आहे. नईम हा पोलीस आदेशानुसार काही काळ तडीपार होता. 

चांदूर रेल्वे येथे २२ सप्टेंबरच्या मध्यरात्री अपहृत मुलीला घरी रात्री सोडण्यासाठी आरोपीचा अज्ञात हल्लेखोरांनी खून केला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.


            

घटनाक्रम

*दि -21/09/2022 रोजी चांदुर रेल्वे शहरातील चाकूचा धाक दाखवून एका  अल्पवयीन मुलीचे अपहरण.


*दिवसभर रात्रभर पोलीस यंत्रनें मार्फत आरोपीच्या शोधत पथके पाठविली. 


*दि, 22/09/2022 रोजी नागरिकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा 


*दि 23/09/2022 रोजी मध्यरात्री 1/30 वाजता अल्पवयीन मुलीला तिच्या घरी आणून सोडण्यात आले. त्याचं रात्री आरोपी नईम यांचा खून.


*सहा तासात नईमचे मारेकरी गजाआड. 

टिप्पण्या