Indian railway-ganesh-festival-akl : गणेशभक्तांना मनस्ताप; सणासुदीच्या काळात २४ ट्रेन रद्द; अकोला मार्ग २२ ट्रेन रद्द

                                             file photo 




भारतीय अलंकार 24

अकोला: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या तरतुदीसाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग/नॉन इंटरलॉकिंग कामामुळे २४ गाड्या रद्द केल्या आहेत.  सण, उत्सवाच्या काळात रेल्वे विभागानं हा निर्णय घेतल्यानं त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे.


१८०३० शालीमार-एलटीटी एक्सप्रेस ३०.०८.२२ ते ०४.०९.२२


१८०२९ एलटीटी-शालिमार एक्सप्रेस ३०.०८.२२ ते ०४.०९.२२


१२८१० हावडा-मुंबई सीएसएमटी मेल ३०.०८.२२ ते ०४.०९.२२


१२८०९ मुंबई सीएसएमटी- हावडा मेल ३०.०८.२२ ते ०४.०९.२२


१२८३४ हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस ३०.०८.२२ ते ०४.०९.२२


१२८३३ अहमदाबाद - हावडा एक्सप्रेस ३०.०८.२२ ते ०४.०९.२२


१२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस ३०.०८.२२ ते ०४.०९.२२


१२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस ३०.०८.२२ ते ०४.०९.२२


१२१०१ एलटीटी-शालिमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ३०.०८.२२, ०२.०९.२२ आणि ०३.०९.२२


१२१०२ शालीमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ०१.०९.२२, ०४.०९.२२ आणि ०५.०९.२२


२२८४६ हातिया-पुणे एक्सप्रेस ०२.०९.२२


२२८४५ पुणे-हटिया एक्सप्रेस ०४.०९.२२


१२८१२ हटिया-एलटीटी एक्सप्रेस ०२.०९.२२ आणि ०३.०९.२२


१२८११ एलटीटी-हटिया एक्सप्रेस ०४.०९.२२ आणि ०५.०९.२२


१२९०५ पोरबंदर-शालीमार एक्सप्रेस ३१.०८.२२ आणि ०१.०९.२२


१२९०६ शालीमार-पोरबंदर-एक्सप्रेस ०२.०९.२२ आणि ०३.०९.२२


२०८२२ संत्रागाची-पुणे हमसफर एक्सप्रेस ०३.०९.२२


२०८२१ पुणे- संत्रागाची हमसफर एक्सप्रेस 05.09.22


२२८९४ हावडा-साईनगर शिर्डी एक्सप्रेस ०१.०९.२२


२२८९३ साईनगर शिर्डी – हावडा एक्सप्रेस ०३.०९.२२


२२९०५ ओखा-शालिमार एक्सप्रेस 04.09.22


२२९०४ शालीमार – ओखा एक्सप्रेस ०६.०९.२२


१८१०९ टाटानगर-इतवारी एक्सप्रेस 30.08.22 ते 04.09.22


१८११० इतवारी - टाटानगर एक्सप्रेस 30.08.22 ते 06.09.22



मुंबई-नागपूर 2.9.2022 रोजी वन-वे स्पेशल ट्रेन


प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष शुल्क आकारून मुंबई ते नागपूर एकेरी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


01181 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शुक्रवार, 2.9.2022 रोजी 21.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.20 वाजता नागपूरला पोहोचेल.


या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव आणि वर्धा येथे थांबा असेल. 


तसेच या गाडीला 2 AC-2 टियर, 4 AC-3 टियर, 10 स्लीपर क्लास आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणी कम गार्ड ब्रेक व्हॅन असतील. 


01181 वन-वे स्पेशल ट्रेनचे विशेष शुल्कावर बुकिंग 31.8.2022 रोजी सर्व PRS केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.




दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे तांत्रिक काम; विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस नागपूर पर्यंतच धावणार


दक्षिण पूर्व मध्य रेल्वे 27.8.2022 ते 3.9.2022 या कालावधीत राजनांदगाव-कळमना तिसऱ्या मार्गाच्या कामासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामासाठी काचेवानी स्टेशनवर तांत्रिक काम करणार आहे, परिणामी मध्य रेल्वेवर मार्गावर काही गाड्या रद्द तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेशन होणार आहेत. 


१२१०५ सीएसएमटी-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस 30.8.2022 ते 4.9.2022 नागपूर पर्यंत धावेल. 


१२१०६ गोंदिया - सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस नागपूरहून ३१.८.२०२२ ते ५.९.२०२२ रोजी सुटेल. 


११०३९ कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस 30.8.2022 ते 4.9.2022 नागपूर पर्यंत धावेल. 


११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस नागपूरहून 1.9.2022 ते 6.9.2022 रोजी सुटेल.



हावडा-अहमदाबाद, आझाद हिंद एक्सप्रेस पूर्ववत धावणार


दक्षिण पूर्व मध्य रेल्वे 27.8.2022 ते 3.9.2022 या कालावधीत राजनांदगाव कळमना तिसऱ्या मार्गाच्या कामासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामासाठी काचेवानी स्टेशनवर तांत्रिक काम करणार आहे. नागपूर विभागातील विकासकामांमुळे याआधी नामनिर्देशित तारखांना रद्द करण्यात आलेल्या खालील गाड्यांची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


१२८३४ हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस वेळापत्रकानुसार ०४.०९.२०२२ रोजी धावेल.


१२८३३ अहमदाबाद-हावडा-एक्स्प्रेस ०४.०९.२०२२ रोजी वेळापत्रकानुसार धावेल.


१२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस वेळापत्रकानुसार ३१.०८.२०२२ ते ०४.०९.२०२२ पर्यंत धावेल.


१२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस वेळापत्रकानुसार ३१.०८.२०२२ ते ०४.०९.२०२२ पर्यंत धावेल.


उद्या हुजूर साहिब नांदेड ते श्रीगंगानगर एक्सप्रेस उशिरा धावणार


गाडी क्रमांक 17623 हुजूर साहिब नांदेड ते श्रीगंगानगर एक्सप्रेस (सुरत-बिकानेर मार्गे) उद्या दिनांक  01 सप्टेंबर, 2022 रोजी नांदेड रेल्वे स्थानकावरून तिची नियमित वेळ सकाळी 06.50 वाजता ऐवजी दुपारी  13:00  (6 तास उशिरा) वाजता सुटेल. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी,असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




टिप्पण्या