Chandrashekhar bawankule bjp: ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे राज राजेश्वर नगरीमध्ये 20 ऑगस्ट रोजी आगमन

file photo 




भारतीय अलंकार 24

अकोला, दि.१८:  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेते माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे राज राजेश्वर नगरीमध्ये 20 ऑगस्ट शनिवार रोजी येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भव्य तयारी भाजपा तर्फे सुरू आहे. भारतीय जनता पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारिप बहुजन महासंघात माजी जिल्हाध्यक्ष बळीराम सिरस्कार आपल्या  हजारो समर्थकांसह 20 ऑगस्ट रोजी मोठी उमरी येथील डॉक्टर सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय मैदानात भव्य दिव्य कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे. पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे खासदार संजय धोत्रे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर  सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहे. यावेळी आमदार  सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकडे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल तेजराव थोरात अर्चना मसने शंकरराव वाकोडे  अंबादास उबाळे रमन जैन अमोल साबळे माधव मानकर महेंद्र पेजावार श्रीकृष्ण मोरे खडे, अशोक गावंडे महेंद्र गोयंका भूषण कोकाटे रितेश सबाजकर राजू काकड एडवोकेट देवाशिष काकड संतोष पांडे राजेंद्र गिरी अमोल गोगे निलेशनीनोरे गणेश अंधारे सचिन देशमुख उमेश गुजर कुसुंबा चंदा शर्मा योगिता पावसाळे डॉक्टर विनोद बोर्डे संजय जीरापुरे, संजय गोडा संजय गोडफोडे अक्षय गंगाखेडकर सचिन कोकाटे राजेश बेले जयंत मसने , रमेश आप्पा खोबरे केशव ताथोड आदी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. 

अकोला महानगरामध्ये दहा ठिकाणी प्रदेशा अध्यक्षांचा भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार आहे शिवनी शिवार राधाकिसन टॉकीज नेहरू पार्क सिविल लाईन चौक रतनलाल प्लांट चौक जठार पेठ चौक आखाडा उमरी या भागात ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते महिला आघाडी तसेच नगरसेवक विविध कार्यकर्ते स्वागत करणार आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा 20 रोजी ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आगमन होत असून तसेच सकल तेली समाजाच्या वतीने सुद्धा त्यांचा स्वागत समारोह स्थानिक डाबकी रोड येथील नाना मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी सुद्धा ते भेट देणार आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थिती हजारो कार्यकर्ते उमरी येथे साडेअकरा वाजता सहभागी होणार आहे.  सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, अशी आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने केले आहे.

टिप्पण्या