Akola crime: ' सेठ जी को लडका हुवा है ' म्हणत दागिने लुबाडणाऱ्याची टोळी शहरात सक्रीय! महिलांनी भुलथापांना बळी पडू नये; अकोला पोलीस दलाचे आवाहन



भारतीय अलंकार 24

अकोला, दि.३: रस्त्याने एकट्या जाणाऱ्या महिलांना (विशेषतः वयोवृध्द) गाठून ' शेठजी को बहुत साल बाद लडका हूवा है, वहा कपडे ओर किराणा बाट रहे है ',अश्या प्रकारचे अमिष दाखवित दागिने लुबाडणाऱ्याची टोळी अकोला शहररात सक्रीय झाली आहे. महिलांनी अश्या भूलथापांना बळी पडू नये,असे आवाहन अकोला पोलीसांनी केले आहे. शहरात दोन दिवस लागोपाठ अश्या प्रकारच्या घटना घडल्याने पोलीस विभाग सतर्क झाला असून, नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.


रिजवान कॉलनीतील घटना 

मंगळवार ०२ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास जुने शहर पोलिस ठाणे हद्दीतील वाशिम बायपास नजीक रिजवान कॉलनीत एक ७५ वर्षीय वयोवृद्ध महिला ही मार्केट मधुन खरेदी करून तीचे राहते घरी एकटी पायदळ जात होती. यावेळी दोन अनोळखी इसमांनी तीला मराठी भाषेमध्ये " सेठजीला खुप वर्षाने मुलगा झाला, ते बाजुलाच कपड्याचे वाटप करीत आहेत. तुम्ही पण चला, तुम्हाला पण दोन कपडे मिळतील', अशी भुलथाप मारुन तीला थोड्या अंतरावर नेले. महिलेच्या गळयातील दागिने व नगदी रक्कम वेगळी काढायला लावुन लबाडीने घेवुन पळून गेले. 


घटनेची पुनरावृत्ती 

बुधवारी ३ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास रामदास पेठ पोलीस ठाणे हद्दीत घटनेची पुनरावृत्ती झाली. एक वयोवृद्ध महिला फतेह चौक नजीक एकटी मार्केटमध्ये खरेदी करीत असतांना अनोळखी इसमांनी तिचे जवळ येवून हिंदी भाषेमध्ये " सेठजी को बहुत साल बाद लडका हुआ है, वो बाजु में ही सबको साडी बाट रहे है, तुम भी चलो, तुम्हें भी वो साडी देंगे" अशी भुलथाप मारुन तीला थोड्या अंतरावर घेवुन जावुन तीचे गळयातील दागिणे व नगदी रक्कम वेगळी काढायला लावुन लबाडीने घेवुन गेलेत. या बाबत संबंधित पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करुन तपास सुरू आहे.


अकोला जिल्हयामध्ये अश्या घटनांची पुनरावृत्ती होवु नये यासाठी पोलीस अधिक्षक जी. श्रीधर , अपर पोलीस अधिक्षक मोनीका राऊत , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले व  जिल्हा पोलीस दलाचे वतीने नागरीकांना मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे



अश्या आहेत मार्गदर्शक सूचना 


* महिलांनी विशेषतः वयोवृद्ध महिलांनी कामानिमित्त घराबाहेर एकटे पायदळ निघु नये. आवश्यक असल्यास नातेवाईकांना सोबत घेवुन जावे.


* महिलांनी विशेषतः वयोवृद्ध महिलांनी कामानिमित्त घराबाहेर एकटे पायदळ जातांना, येतांना किंवा मार्केट मध्ये खरेदी करतांना अनोळखी इसमांशी बोलणे टाळावे.


* कोणताही अनोळखी इसम हा महिला एकटी आहे हे पाहुन जवळ येवुन "सेठजीला मुलगा झाला म्हणुन जवळच किराणा वाटप चालु आहे किंवा कपडे वाटप चालु आहे" अशा प्रकारची भुलथाप मारून सोबत चलायला सांगत असेल तर त्याचे सोबत जावु नये.


* कोणताही अनोळखी इसम हा महिला एकटी आहे हे पाहुन जवळ येवुन पोलीस असल्याची बतावणी करून भुलथाप मारून सोबत चलायला सांगत असेल तर त्याचे सोबत जावु नये. 


* अनोळखी इसमाने महिला एकटी असल्याचे पाहून वाट अडवुन भुलथाप मारून अंगावरील दागिणे अगर रक्कम काढायला सांगितल्यास तसे करु नये.


* घटना घडल्यास जवळच्या प्रतिष्ठान मधील लोकांमार्फत अगर नातेवाईक मार्फत तात्काळ पोलीसांना माहिती द्यावी.



टिप्पण्या