- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला, दि.१३:सिविल लाइन पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या न्यू तापडिया नगर मधे शनिवारी रात्री ३५ वर्षीय युवकाची गणपति मंदिरासमोर हत्या झाल्याची घटना घडली.मृतक युवक हा पंचशील नगर चिखलपुरा परिसरातील रहिवासी असल्याचे कळते.
मृतकाचे नाव विनोद वामनराव टोबरे नाव आहे. विजय हा सामजिक कार्यकर्ता होता. परिसरातील लोकांच्या अडी अडचणीला धावून जाणारा युवक होता. याआधी दोन राजकिय पक्षात कार्यरत होता. ही हत्या राजकिय वर्चस्वातून झाली की, आणखी कोणते दुसरे कारण आहे, याबाबात अद्याप माहिती समोर आली नाही. हत्याकांड झाल्याचे कळताच घटनास्थळी श्वान पथक आणि गून्हे अन्वेषण विभाग पथक पोहचले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आला.
मारेकऱ्यानी युवकांवर धारधार शस्त्रने सपासप वार करुन गंभीर जख्मी केले.त्याच्या डोक्यावर दगड विटाने वार करून अक्षरशः ठेचून हत्या करण्यात आली आहे. एकाच वेळी चार ते पाच मारेकऱ्यांनी विजयवर वार केला असावा,असा कयास पोलीसांनी लावला आहे. मारेकऱ्यांच्या शोध घेण्यास पोलीस विभागाने तपास चक्रे फिरविली आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा