Water supply disrupted damaged pipeline: पाईपलाईन क्षतिग्रस्‍त झाल्‍यामुळे गंगा नगर, लोकमान्‍य नगर आणि जोगळेकर प्‍लॉट जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा विस्‍कळीत





भारतीय अलंकार 24

अकोला, दि.८: अकोला महानगरपालिका पश्चिम झोन अंतर्गत गंगा नगर जलकुंभ, लोकमान्य नगर जलकुंभ व जोगळेकर प्लॉट जलकुंभ ला पाणी पुरवठा करणारी 600 मी. मी व्यासाची मुख्य इनलेट ची पाईप लाईन 7  जुलै रोजी दुपारी 1 वाजता राष्ट्रीय महामार्गचे रूंदीकरण कामाचे वेळेस लक्झरी बस स्टँड निमवाडी जवळील नदी पात्रचे जवळ क्षतिग्रस्त झाली आहे. 



दुरुस्तीचे काम राष्ट्रिय महामार्गाचे कंत्रादारांकडून करून घेण्यात येत आहे.  दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत या जलकुंभ वरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेवून मनपा प्रशासनास सहकार्य करण्‍याचे आवाहन जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एच.जी. ताठे यांनी केले आहे.


गंगा नगर जलकुंभ अंतर्गत येणारा गंगा नगर परिसर, सालासर बालाजी मंदीर परिसर, राहत नगर, इंस्‍पेक्‍टर नगर, एमरोल्ड कॉलनी, गीता नगर परिसर, अकोली, सोमठाणा इत्‍यादी, लोकमान्‍य नगर जलकुंभ अंतर्गत मारोती नगर, गुरूदेव, न्‍यु गुरूदेव नगर, अनंत नगर, शांतता नगर, भवानी नगर, पार्वती नगर, मेहरे नगरचा काही भाग, रघुवीर नगर, चिंतामणी नगर, भारती प्‍लॉट, भिरड वाडी, शिवसेना वसाहत, तथागत नगर आदि तसेच जोगळेकर प्‍लॉट जलकुंभ अंतर्गत भगत वाडी, हबीब नगर, खैर मोहम्‍मद प्‍लॉट, शबनम नगर, साई नगर, फडके नगर, जोगळेकर प्‍लॉट आदिंचा समावेश असून या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.  

टिप्पण्या