road accident: चार मजुरांसह ट्रॅक्टर ट्राॅलीसह पुलावरुन नदीत कोसळला तीन जण जखमी; पिंजर जवळील घटना



भारतीय अलंकार 24

अकोला, दि.३: पिंजर येथे विटाखाली करुन  पातुर नंदापुरकडे जात असतांना कारंजा ते पिंजर रोडवरील पिंजर जवळील स्मशानभूमीला लागुनच असलेल्या पिंजर्डा नदीच्या पुलावरून चार मुजरांसह ट्रॅक्टर ट्राॅलीसहीत नदीत कोसळल्याची घटना आज घडली.या अपघातात तीन मजुर गंभीर जखमी झाले आहेत.


घटनेची माहिती मिळताच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जवान रुग्णवाहिकासह घटनास्थळी दाखल झाले. ट्राॅली नंबर एम.एच.३० ए.एन.४७४ ट्रॅक्टरवर नंबर नाही. या घटनेतील पंकज भास्कर वाडकर वय अंदाजे (३०) वर्ष रा.पातुर नंदापुर, प्रविण गजानन वाडकर वय अंदाजे (४०) वर्ष रा.पातुर नंदापुर, हर्शल दसरथ सुरजुसे वय अंदाजे (२५) वर्ष रा.पातुर नंदापुर हे जखमी झाले आहेत.



बचाव पथकाने चारही मजुरांना बाहेर काढुन तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. वैद्यकिय अधिकारी डाॅ.आगलावे यांनी उपचार करून लगेचच क्षणाचाही विलंब न करता पुढील उपचारासाठी बचाव पथकाच्या रुग्णवाहिकेतून अकोला जिल्हा रुग्णालयात तीनही जखमींना पाठविले,अशी माहिती बचाव पथकप्रमुख दीपक सदाफले यांनी दिली.


अवघ्या १० मिनिटात जखमींना बाहेर काढण्यात यश 

मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन पिंजर येथील फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जवान वेळीच धाऊन आले आणी अवघ्या दहा मिनटात तीन जखमी बाहेर काढुन जागेवरच प्रथमोपचार+सीपीआर स्टेटमेंटस देऊन पुढील उपचारासाठी पथकाच्याच रुग्नवाहीकेने प्राथमिक आरोग्य केंद्र ते अकोला करीता रवाना केलें.

टिप्पण्या