CBSE 10th Result: सीबीएसई दहावी निकाल:'प्रभात'ची दुर्वा डागा ९९.२० टक्के गुणांसह प्रथम ; आर डी जी पब्लिक स्कुलच्या विदयार्थ्यांची उत्तुंग भरारी



भारतीय अलंकार 24

अकोला, दि.२२: सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा बहुप्रतिक्षित निकाल शुक्रवार दि. २२ जुलै रोजी घोषित झाला. प्रभात किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या वर्षी उज्ज्वल यशाचा नवीन उच्चांक गाठला असून १०० टक्के निकालासह तब्बल ३७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. दुर्वा डागा हिने  सर्वाधिक  ९९.२०  टक्के गुण प्राप्त केले असून ती शाळेतून पहिली आली आहे. 

      

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रभात किड्स स्कूलने इयत्ता दहावीच्या निकालात उत्कर्ष साधला आहे. 'प्रभात'ची दुर्वा डागा हिने ९९.२० टक्के गुणासह संस्कृत विषयतात  १०० पैकी १०० गुण मिळविले. 

      

प्रभात'च्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या 3७ गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मधुश्री दळवी (९८.६०), प्रथमेश तांदळे (९८), सोहम श्रीनागर (९६.६०), विवेक तायडे (९५.६०), गौरव जैन (९५.४०), संस्कृती टोले (९५.२०) तनया घोरे (९५), देवांश सारडा (९५), भाविक लड्ढा (९४.६०), भूमी राठोड (९४.६०), दिशा राठोड (९४.६०), पार्थ बावनकुळे (९४.४०), अनुष्का लाहोळे (९४.४०), ओजस राठी (९४.४०), रेवती गीते (९४.२०), कौस्तुभ उजाडे (९४),पार्थ रोठे (९३.६०), तन्मय खंडारे (९३.६०), निशिता पटेल (९३.४०), व्यंकटेश राऊत (९३.२०), साक्षी मंडाले (९३.२०), समीक्षा महाजन (९३.२०), लुभानी त्रिवेदी (९३), साक्षी भट्टड  (९३), मानस मेहता (९२.६०), श्रावणी वाघमारे (९२.२०), यश मुंगसे (९२.२०), प्रथम पांडे (९२.२०), अजय आगरकर (९२), संमिहन देशमुख (९१.८०), श्रेया तिजारे (९१.६०), सृष्टी बलोदे  (९१.६०), अखिलेश भांडेकर (९१), गार्गी गवई (९०.८०), मनस्वी बेलसरे (९०.६०) आणि स्निग्धा देशमुख (९०) यांचा समावेश आहे.   

      

प्रभात किड्सचे १९९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी ३७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत  तर  ७७ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे.  

      

यशस्वी विद्यार्थ्यांचे 'प्रभात'चे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी, शाळा समन्वयक मो. आसिफ, उच्चमाध्यमिक समन्वयक प्रशांत होळकर तथा  व सर्व विभाग प्रमुख, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


 

'प्रभात'च्या १२ विद्यार्थ्यांनी प्राप्त केले १०० पैकी १०० गुण


इंग्रजी, मराठीसह संस्कृतमध्ये प्रभातच्या  १२ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १००गुण प्राप्त केले आहेत. तनया घोरे हिने इंग्रजी मध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. नमन गुल्हाने, ख़ुशी दुतोंडे, रेवती गीते, संस्कृती टोले या विद्यार्थांनी मराठी मध्ये तर भाविक लड्ढा, भूमी राठोड, दुर्वा डागा, मधुश्री दळवी, स्निग्धा देशमुख, तनया घोरे आणि व्यंकटेश राऊत या विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त करुन विक्रम प्रस्थापित केला आहे. 

 


सीबीएसई बारावीमध्ये प्रभातची ईशा सारडा ९२ टक्के गुणांसह प्रथम  


 सी.बी.एस.ई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल शुक्रवारी घोषित झाला असून प्रभात सीनियर सेकंडरी स्कूलची ईशा सारडा ९२ टक्के गुणांसह प्रथम आली आहे तर यश काळणे ९०.८० टक्के गुणांसह द्वितीय आला आहे.

    

प्रभातने उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम राखली आहे. प्रभातचे १९ विद्यार्थी अनुक्रमे समृद्धी टाले  (८८.२०), शंतनु साबळे(८७.६०), अमिशा शाहु (८५.८०), हर्षल टाले (८४.८०), राम निर्मल (८३), शर्वरी मिसुरकर (८२.६०), योगेश काटेकर (८२.४०), निर्माेही मेशरकर (८०), ज्ञाना वालकर (७८.८०), निशांत पातोंड (७८), गणेश गावंडे (७८), अनौष्का जोशी (७७.६०), ग्रिशीका अग्रवाल (७६.८०), स्पंदन राऊत (७६.४०), रश्मी देशमुख (७६.२०), निखिल वाधवानी (७५.८०), समृद्धी पाटील (७५) प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर १३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्र्तीण झाले आहेत.  


      

ईशा सारडा हिने बॉयोलॉजी विषयात ९८ गुण प्राप्त केले आहेत तर समृद्धी टाले हीने शाररिक शिक्षण विषयात ९९ गुण मिळविले आहेत. प्रभात किड्स स्कूलची सीबीएसई उच्च माध्यमिक इयत्ता बारावीची ही चवथी बॅच असून यावर्षी एकूण ३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.



                       ………


सी बी एस ई 10 वी च्या परीक्षेत आर.डी.जी पब्लिक स्कुल च्या विदयार्थ्यांची उत्तुंग भरारी




दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा आरडीजी पब्लिक स्कुल च्या विदयार्थ्यांनी 100 टक्के यशाची परंपरा कायम राखत दिनांक 22 जुलै 2022 रोजी घोषित झालेेल्या सी बी एस ई 10 वी च्या परीक्षेत उत्तुंग भरारी घेवुन शाळेचा गौरव वाढवला. हया बॅचमध्ये 81 टक्के विदयार्थ्यांनी प्राविण्यता यादीत स्थान मिळवले तर 27 टक्के विदयार्थ्यांनी 90 टक्केच्या वर गुण मिळवले तसेच उर्वरीत सर्व विदयार्थ्यी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले. 

  

या सर्व विद्यार्थ्यांमध्ये तन्मय शुक्ला ने 96.2 टक्के मार्क मिळवुन शाळेमध्ये प्रथम स्थान मिळवले. समृध्दी कुचर हीने 94 टक्के मार्क मिळवुन शाळेमध्ये व्दितीय स्थान मिळवले तर स्तूती शाह हीने 93 टक्के मार्क मिळवुन शाळेमध्ये तृतीय स्थान मिळवले. तसेच बाकी सर्व विदयार्थ्यींना 67 टक्याच्या वर मार्कस मिळाले आहेत.


मुख्याध्यापिका डॉ. उषा वानखेडे तसेच मुख्याध्यापिका श्वेता चोमवाल यांनी सर्व विदयार्थ्यींचे अभिनंदन केले. करोना कालावधित सुरू असतांना शिक्षण प्रणाली मध्ये बदल होचुन सुध्दा विदयार्थ्यींच्या व शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाले आहे.


सर्व विदयार्थ्यींचे आणि त्यांच्या पालकांचे शाळेचे अध्यक्ष  दिलीपराज गोयनका यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्वल भविष्याची कामना केली. तसेच सर्व शिक्षक वृंदांचे त्यांनी केलेल्या उल्लेखनिय प्रयत्नाबध्दल अभिनंदन केले.



      



टिप्पण्या