Akola court: खाऊचे अमिष दाखवून बालिकेचा विनयभंग; आरोपीस सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षाभारतीय अलंकार 24

अकोला : अल्पवयीन मुलीला खाऊचे अमिष दाखवून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस सोमवारी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.


मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी संदीप अरुण खंडारे (वय ३४ वर्षे रा. लखपुरी) याच्यावर अल्पवयीन बालिकेचा खाऊचे आमिष दाखवून स्वतः चे घरात उचलून नेऊन विनयभंग केल्याच्या आरोप होता. विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. डी.  पिंपळकर यांचे न्यायालयात आरोपीवर विविध आरोपांबद्दल दोषारोप ठेवण्यात आले होते. पिडीतेच्या वडिलांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये या प्रकरणी फिर्याद दाखल केली होती. प्रकरणात सरकार तर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी पुराव्यांचे आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठवल्यानंतर भा.दं.वि. कलम ३५४ ब मध्ये ७ वर्ष सक्त मजुरी दहा हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद व पोक्सो कायदा कलम ७-८ मध्ये ५ वर्ष सक्त मजुरी दहा हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा आरोपीस सोबतच भोगावयाच्या आहेत.


पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह सोळंके यांनी या प्रकरणाचा तपास केला. सरकार तर्फे सहाय्यक सरकारी वकील किरण खोत यांनी बाजू मांडली. हेड कॉन्स्टेबल संजय भरसाकळे व सी एम एस चे प्रवीण पाटील यांनी पैरवी म्हणून सहाय्य केले. 


प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार फितूर 


या प्रकरणात एक प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार प्रभुदास ढोरे हा फितूर झाला. त्याच्यावर भा. दं. वि. कलम १९१ नुसार खोटी साक्ष दिल्या मुळे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


           ………………………


अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकास तीन वर्ष सश्रम कारावसाची शिक्षा 


अकोला :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तिचा विनयभंग करणाऱ्या युवकास शनिवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांनी भारतीय दंड विधान कलम ३५४ अ, ३५४ ड व  कलम ७, ८, ११, १२ पोक्सो कायदया अंतर्गत दोषी ठरवुन तीन वर्ष सश्रम करावसाची शिक्षा सुनावली आहे.


घटनेची हकीकत अशी की, या प्रकरणातील अज्ञान पिडीता हिने सिव्हील लाईन पोलीस स्टेशन येथे एप्रिल २०१९ रोजी फिर्याद दिली की, ती इयत्ता  दहावी मध्ये शिकत असून, आरोपी हा उमरी येथे भाडयाच्या घरात राहतो.  पिडीता ही शाळेमध्ये जात येत असतांना तिचा पाठलाग करुन प्रेम व्यक्त करायचा. मात्र मुलीने प्रतिसाद दिला नसल्याने तिला शिवीगाळ करुन जिवानिशी मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच विनयभंग केला. पिडीताने आरोपी विरूध्द पोलीसात तक्रार नोंदविली. गुन्हयाचा तपास पुर्ण झाल्यावर आरोपी विरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.


प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरीता सहा साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय मानुन न्यायालयाने आरोपी रंजित पंडितराव देशमुख (रा. गजानन नगर, डाबकी रोड) याला कलम ३५४-अ. ३५४-ड भा.द.वि तसेच पोक्सो कायदयाचे कलम ७, ८, ११, १२ अंतर्गत दोषी ठरवून ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये पाच हजार दंड अशी शिक्षा. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील शाम खोटरे यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली. तसेच कोर्ट पैरवी गावंडे व एल.पी.सी. सोनु आडे यांनी सहकार्य केले.


        …………………………..


धनादेश अनादर प्रकरणी यवतमाळच्या व्यापाऱ्यास सहा महिन्याची कैद 


अकोला: देवाण घेवाण व्यवहारात धनादेशाचा गैरफायदा घेत फसवणूक केल्या प्रकरणी सोमवारी अकोला जिल्हा प्रथम श्रेणी तिसरे न्यायाधीश जी. डी. पाटील यांच्या न्यायालयाने धनादेश देणाऱ्या गौरी कृषी केंद्राचे प्रोपायटर तुकाराम नरसिंग तिडके (रा धानकी जि. यवतमाळ) याला ६ महिन्याची साधी कैद व १ लाख २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.


ॲडव्हान्स पेस्टीसाईड कंपनी हे कीटकनाशक बनविते. या कंपनीकडून यवतमाळ जिल्ह्यातील धानकी येथील रहिवाशी तुकाराम नरसिंग तिडके सारडा यांनी गौरी कृषी केंद्रा साठी २५ आक्टोंबर २०१८ ला कीटक नाशक खरेदी केली होती. त्यासाठी धनादेश क्रमांक ००८२७५ हा एक लाख रुपयेचा धनादेश पेस्टीसाईड कंपनीला दिला होता. कंपनीने  धनादेश अकोला येथील एका बँक खात्यात जमा केला होत मात्र तो धनादेश अनादारीत झाला असल्याचे बँकेने कंपनीला कळविले होत त्यानुसार तुकाराम तिडके यांना नोटीस देऊन तशी माहिती दिली होती. परंतु तिडके यांनी कंपनीची रक्कम दिली नाही, यासाठी न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन आरोपीस दोषी ठरवत, जिल्हा प्रथम श्रेणी तिसरे न्यायाधीश जी. डी. पाटील यांच्या न्यायालयाने धनादेश देणाऱ्या, गौरी कृषी केंद्राचे प्रोप्रायटर तुकाराम नरसिंग तिडके (रा. धानकी जि यवतमाळ) याला ६ महिन्याची शिक्षा व १ लाख २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात ऍडव्हान्स पेस्टीसाईड कंपनीच्या वतीने ॲड. मनमोहन सारडा यांनी बाजू मांडली.


टिप्पण्या