wildlife antelope rescued from dogs: कुत्र्यांच्या तावडीतून काळविटाची सुटका: वेळीच मदतीला धावले पोलीस म्हणून वाचले प्राण;वनविभाग पथक घटनास्थळी पोहचले दोन तास उशीरा


 

 


भारतीय अलंकार 24

अकोला : शेतामध्ये मातीत फसलेल्या एका काळविटाला मोकाट कुत्र्यांची टोळी जिवंत मारण्याचा प्रयत्न करीत होते. ही बाब एका पोलीस कर्मचाऱ्याला दिसून आली. गुढधी परिसरातील हे दृश्य पाहून पोलीस कर्मचारी मदतीला धावले अन् कुत्र्यांच्या तावडीत सापडलेला काळवीटाची सुटका केली. रवी यादव असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.



कुत्र्यांच्या हल्ल्यात  काळवीट गंभीर जखमी झाले असून, पोलीस कर्मचाऱ्याने जखमी काळवीटावर प्राथमिक उपचार करून त्याची तब्बल दोन तास काळजी घेतली, हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.  



जखमी काळवीट बाबत अकोला वनविभागाला माहिती देवूनही त्यांच्याकडून वेळेवर कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. अखेर, अकोला वनविभाग दोन तासानंतर घटनास्थळी दाखल होवून काळवीटाला ताब्यात घेतले. बुधवारी झालेल्या या घटनेमुळे अकोला वनविभागाचा दिरंगाई पणा परत एकदा आधोरेखित झाला आहे. सध्या वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. मग बिबट्या असो किंवा हरीण. प्राणी मानवी वस्तीशेजारी दिसून येत आहेत. असेच अकोल्यातील गुड़धी नजीकच्या बुधवारी परिसरात काळविट आढळून आले. वनविभागाने या बाबीकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी म्हंटले आहे. 

दरम्यान,सिव्हील लाईन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले रवी यादव हे बुधवारी पट्रोलिंग करीत असताना, काही मोकाट कुत्र्यांची टोळी काळविटाला जिवंत मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यादव हे लगेच मदतीला धावले, अन् कुत्र्यांना दगड मारून हुसकावून लावले. महत्प्रयासाने त्यांनी काळविटाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. या हल्ल्यात जखमी अवस्थेत असलेल्या काळवीटावर प्राथमिक उपचार केला. यानंतरही तब्बल दोन तास या पोलीस कर्मचाऱ्याने जखमी काळवीटाची काळजी घेतली आहे. या घटनेनंतर त्यांचं सर्वत्र कौतूक होत आहे.

 


जखमी अवस्थेत असलेल्या काळवीट बाबत पोलिसांनी वन परिक्षेत्र अधिकारी म्हणजेचं अकोला वनभागाला माहीती दिली. सोबतचं पोलिसांच्या ११२ या हेल्प लाइनवरुनही माहीती पोहचविली, मात्र अकोला वन विभागाने कुठल्याच प्रकारच्या हालचाली केल्या नाही. अखेर तब्बल दोन तासानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एवढा विलंब का, याबाबात पोलिसांनी वनविभाग पथकाला विचारणा केली असता त्यांच्यासोबत वन कर्मचाऱ्यांनी वाद घातला. 



टिप्पण्या