wasim choudhari-pocso crime- akl: वसीम चौधरीच्या 'ईक्‍वीनॉक्‍स स्‍टडी हब' चा व्यवसाय परवाना रद्द ; अकोला मनपाने लावले सील




नीलिमा शिंगणे जगड

अकोला: शिकवणी क्लासच्या नावाखाली गैरकृत्य करणारा आरोपी वसीम चौधरी सध्या कारागृहात आहे. पिडीत विद्यार्थीनी सोबत घडलेल्‍या गैर प्रकाराचे ठिकाण कोचींग क्‍लास व लायब्ररी हे असल्‍याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने गुरुवारी अकोला मनपाने चौधरी कोचिंग क्लासेसची लायब्ररीचा व्यवसाय परवाना रद्द करुन सील करण्याची कारवाई केली.


कारवाईची पार्श्वभूमी 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनपा पुर्व झोन अंतर्गत तोष्‍णीवाल ले-आऊट येथे चौधरी कोचींग क्‍लास नावाने खासगी शिकवणी वर्गचा व्‍यवसाय असून या व्‍यवसायाच्‍या आड अल्‍पवयीन विद्यार्थींनीस अश्‍लील मॅसेज पाठविणे, विनय भंग करणे, शारीरिक लगट करणे असे गैरकृत्य चालायचे. याविरोधात एका विद्यार्थींनीने क्लासचा संचालकवर पोलीस तक्रार केली. पोलीस कारवाई झाली असून, सध्या हा संचालक न्यायिक कोठडीत आहे.



अशी झाली कारवाई


चौधरी कोचींग कलासेसचा संचालक शेख वसीम शेख जमील याचे विरूध्‍द पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्‍हा दाखल झालेला आहे.  तोष्‍णीवाल ले-आऊट येथे ईक्‍वीनॉक्‍स स्‍टडी हब या नावाने त्याची लायब्ररी असून, या लायब्ररीचे सन 2022-23 चे महानगरपालिकेचे टॅक्‍स पावतीवर लायब्ररीचे मालक शेख वसीम शेख जमील, शेख नाझीम शेख जमील,शेख तनजीम शेख जमील असे नाव नमूद असल्‍याचे पोलीस तपासात निष्‍पन्‍न झाले आहे. तसेच पिडीत विद्यार्थी सोबत घडलेल्‍या प्रकाराचे ठिकाण कोचींग क्‍लास व लायब्ररी हे असल्‍याचे देखील पोलीस तपासात आढळून आले आहे.

यामुळे गुरूवार 2 जून रोजी मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या  आदेशान्‍वये  वसीम चौधरीच्या ईक्‍वीनॉक्‍स स्‍टडी हबचा मनपा व्‍यवसाय परावाना रद्द करून ईक्‍वीनॉक्‍स स्‍टडी हब वर मनपा पुर्व झोन कार्यालय आणि बाजार - परवाना विभागाव्‍दारे सील लावण्‍याची कारवाई करण्‍यात आली आहे.


  

यांनी केली कारवाई


या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी विजय पारतवार, सिव्‍हील लाईन पोलीस स्‍टेशनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी, पोलीस उप निरीक्षक प्रभाकर खोंड, सहायक कर अधिक्षक देवेंद्र भोजने, कनिष्‍ठ अभियंता नरेश कोपेकर, तुषार जाने, कृष्‍णा वाकोडे, दीपराज महल्‍ले, दादाराव सदांशिव, बाजार विभागाचे गौरव श्रीवास, रवि निवाने, संजय पाचपोर, निखील लोटे, सुरेंद्र जाधव तसेच पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.


टिप्पण्या