vasant desai stadium swimming pool : चिमुकल्या जलतरण प्रशिक्षणार्थींना जय श्रीराम गृप तर्फे स्नेहपूर्ण निरोप; प्रशिक्षक योगेश पाटील यांचा सत्कार





नीलिमा शिंगणे जगड

अकोला: वसंत देसाई स्टेडियम स्थित जलतरण तलाव येथे महिनाभरापासून उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सुरु होते. आज शिबिराचा समारोप करण्यात आला. यानिम्मित शिबिरात सहभागी चिमुकल्या प्रशिक्षणार्थीना जय श्रीराम ग्रुपच्या वतीने स्नेहपुर्ण निरोप देण्यात आला. JSG  गेल्या 7 वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहे.





 


या निरोप समारंभात चिमुकल्यांसह त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरंतर शिक्षकांकडून या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात येत असतो. मात्र, येथील हौशी पोहणारे या विद्यार्थ्यांचे शिक्षक बनले आहेत. या चिमुकल्यांना पोहता यावे, याकरिता नरेंद्र राठी , राधेश्याम मोदी , पवन केडिया , नंदूभाऊ बुलबुल , हेमेन्द्र राजगुरू , तोष्णीवाल , डॉ.काटे , संजय कुडूपले, गोडा काकासह तरणतलावचे सर्व कर्मचारी विशेष मेहनत घेतात. चिमुक्यांना आपला जीव वाचवता आला पाहिजे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.





आजच्या या निरोप समारंभात येथील वातावरण थोडं भावुक झालं होतं. मात्र चिमुकले पोहणं शिकले याचा विशेष आनंदही होता. उपस्थित सर्व चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांना अल्पोपहार व चॉकलेटचे वितरण करण्यात आले. तर पुढील वर्षी हे चिमुकले परत येतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.





तत्पूर्वी, जिल्हा क्रीडा संकुल अकोला जलतरण तलाव ग्रुपच्या वतीने चिमुकल्यांसाठी प्रोत्साहन पर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. लकी ड्रॉ द्वारे विजेता चिमुकल्यांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी नॅशनल स्विमिंग कोच योगेश पाटील यांचा विशेष सत्कार संपूर्ण स्विमिंग ग्रुपच्या वतीने करण्यात आला. मोठ्या उत्साहात हा छोटेखानी सोहळा पार पडला.








टिप्पण्या