tractor tanker crashed into the well: शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेला ट्रॅक्टर टॅंकरसह विहीरीत कोसळला; चालकाचा दुर्दैवी अंत, माझोड येथील घटना




नीलिमा शिंगणे जगड

अकोला: माझोड (ता.पातुर. जि.अकोला ) येथील शेतातील विहरीवर पाणी भरण्यासाठी गेलेला ट्रॅक्टर टॅंकरसह विहीरीत कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली होती.या घटनेत ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी अंत झाला. पिंजर येथील  संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबवित चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यास उशिरा रात्री यश मिळविले.




पिंजरच्या मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची जिगरबाजी शेवटी रात्री दोन वाजता साठ फुट खोल विहीर आणी 25 फुट खोलपाण्यातील ट्रॅक्टर खाली दबलेला मृतदेह मोठ्या चिकाटीने कसोशीने प्रयत्न करुन बाहेर काढला. यावेळी पोलीस प्रशासनासह उपस्थित गावक-यांनी आश्चर्य व्यक्त केले.




घटनेची हकीकत अशी की, माझोड येथील शरद वडतकर यांच्या चिखलगाव ते माझोड रोडला लागुनच असलेल्या शेतातील विहीरीत सोमवार 6 जुन रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजताच्या दरम्यान  राजेश किसन मते (रा.माझोड वय अंदाजे 45 वर्ष) हे पाण्याचे टँकरट्राॅली असलेला ट्रॅक्टरसह विहरीत कोसळल्याची घटना घडली. 




घटनेची माहिती पातुर पोलीस स्टेशनने पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. लगेच दीपक सदाफळे यांनी  रेस्क्यु ऑपरेशन साहित्यासह पथकाचे सदस्य ऋषीकेश राखोंडे,धिरज आटेकर, ऋषीकेश तायडे, शिवम वानखडे यांच्यासह घटनास्थळी पोहचले.  तात्काळ सर्च ऑपरेशन चालु केले. 





जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी खाली उतरून सिन ट्रेस केला असता, ट्रॅक्टर हा बुडात असुन त्याच्या वर 25 फुट पाणी असल्याने तसेच विहीरीत साईटला कच्चा मुरमाटाईप असल्याने यावेळी क्रेनचे व्हायब्रेशन होऊन प्रेशरने विहीर किंवा फरमे कोसळण्याची दाट शक्यता होती. बुडाखाली ट्रॅक्टर आणि त्याखाली दबलेला मृतदेह असल्याची शक्यता गावक-यांना होती. अशावेळी हे आगळे वेगळे व मनाला चॅंलेंज करणारे सर्च ऑपरेशन होते. यालाही सामोरे जाऊन मोठया धाडसाने सर्च ऑपरेशन पथकाने चालु केले. परंतु अनेक प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी रात्री दोन वाजता ट्रॅक्टर खाली दबलेला मृतदेह वायररोप, लोखडी रॅम्पच्या साहाय्याने बुडातील ट्रॅक्टर जागेवरच पलटी करुन तीन रोप राॅडसह कव्हरिंगला देऊन अखेर मृतदेह बाहेर काढला. 



हे सर्च ऑपरेशन पाण्याखाली केले. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे हे आश्चर्यकारक सर्च ऑपरेशन काल मात्र उपस्थित लोकांनी अनुभवले. यावेळी लोकांचा या सर्च ऑपरेशनवर  विश्वासच बसत नव्हता की, हा मृतदेह काढलाच कसा. यावेळी खास मोठी मदत व सहकार्य क्रेन चालकांचे  मिळाले. उपस्थित नागरिकांनी सुद्धा मोठे सहकार्य केले. पातुर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.



टिप्पण्या