Sant Vasudev Maharaj Palkhi Akot: गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान




भारतीय अलंकार 24

आकोट (जि.अकोला ) : श्री क्षेत्र श्रद्धासागर निवासी महावैष्णव श्री संत वासुदेव महाराज  पालखीने आज श्रीक्षेत्र पंढरपूरकडे भक्तीमय वातावरणात प्रस्थान केले.


खांद्यावर पताका,आबदागिरी व टाळकरी मृदंगाचे स्वरात ज्ञानोबा तुकारामांचा गजर करीत अभंग गात नाचत  महाराज मंडळी व शेकडो वारकरी या पायदळ दिंडीत सहभागी झाले आहेत. 



गुरुमाऊलीच्या आकर्षितरित्या फुलांनी सुशोभीत पालखी रथात गुरुमाऊलीचा रजत मुखवटा व पादुका संस्थापित करण्यात आल्या. गुरुमाऊलींच्या  या रथाची संतनगरीत आकोटवासियांनी श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. आकोट शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत अकोला मार्गावरील ह.भ.प. श्री गजानन जायले यांचे निवासी पहिल्या मुक्कामासाठी विसावला. स्व.तुषार पुंडकर मित्र परिवार द्वारा शिवाजी महाविद्यालय चौकात  सुशांत  पुंडकर यांनी पालखीचे स्वागत करुन पाणी व थंडपेय वितरीत करण्यात आले. संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर यांचे निवासी पालखी पुजन व वारक-यांसाठी नास्ता व शरबत अविनाश सावरकर, डाॕ सुहास कुलट, धनंजय वाघ यांनी चहापान व शरबतची व्यवस्था केली.




गुरुमाऊलीच्या निवासी संत वासुदेव नगरवासियांनी भक्तीमय स्वागत केले. यांठिकाणी हरिपाठ पार पडला. गुरुमाऊलींची महाआरती माधवराव मोहोकार व पुरुषोत्तम मोहोकार यांचे हस्ते पार पडली. 





यात्रा चौकात रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त दादाराव पुंडेकर व पुष्पाताई पुंडेकर यांनी पुष्पांजली मंगल कार्यालयात गुरुमाऊलींचे पुजन केले. या परिसरातील भाविकांनी भावपूर्ण दर्शन घेतले. व्यवस्थापक अंबादास महाराज यांचे मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा ६५० कि,मी. प्रवास करुन पंढरपूर क्षेत्री पोहोचणार आहे.


दरम्यान श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे गुरुमाऊलींचा महाभिषेक, टाळ मृदंग विणा व रथासह वाहनांचे विधिवत पुजन पार पडले. संस्थाध्यक्ष ह.भ.प.वासुदेवराव महाराज महल्ले यांचे प्रस्थानपर किर्तन पार पडले. पादुकांचा अभिषेक मिना जायले, शालिनी महल्ले यांनी केला.





वारीत सहभागी वारक-यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले . कालवाडीचे सरपंच राहुल पाटील हिंगणकर द्वारा वारक-यांसाठी  महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली होती.. याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर,सचिव रविंद्र वानखडे,सहसचिव मोहनराव पाटील जायले व अवि गावंडे,विश्वस्त दादाराव पुंडेकर, सदाशिव पोटे,प्राचार्य गजानन चोपडे, महादेव ठाकरे,अशोक पाचडे, दिलिप हरणे, जयदिप सोनखासकर, केशवप्रसाद राठी, गजानन दुधाट, नंदकिशोर हिंगणकर ,अनिल कोरपे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या